६ वर्षाच्या मुलाने गिळला दात, फुप्फुसातून काढण्यात आला...

श्वास घ्यायला त्रास होत असल्याने, या मुलाला तात्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं
doctors doing operations
doctors doing operations sakal

मुंबईतील एका मुलाच्या उजव्या फुप्फुसातून डॉक्टरांनी चक्क दात काढलाय. मुंबईतील वोकहार्डट् हॉस्पीटलमधील डेंन्टिस्टने ही शस्त्रक्रिया केली. ६ वर्षाच्या ह्या मुलाने चूकुन दात गिळला होता. या मुलाचा दात हलत होता. एकदम तो दात निखळला अन् मुलाकडून गिळला गेला होता. तो दात उजव्या फुप्फुसात गेला. यामुळे लहानग्याला श्वास घ्यायला त्रास होत होता. त्याला काही खाता-पिता य़ेत नव्हतं. त्याला याच अवस्थेत कुंटुबियांनी मीरा रोड येथील डेंन्टिस्टकडे घेउन गेले. यानंतर त्याच्या छातीचे एक्स रे काढण्यात आले. त्यात उजव्या फुप्फुसात त्यांना दात आढळला.

त्यानंतर लगेचच या मुलान ऑपरेशन थिएटरमध्ये हलविण्यात आलं. रिजीड ब्रॉन्कोस्कोपीने दात काढण्यात यश आले. या तंत्रज्ञानात सुक्ष्म कॅमेऱ्यासहीत एक यंत्र फुप्फुसात सोडण्यात आलं. आणि चिमट्या (Medical forcep) च्या मदतीने यशस्वीरीत्या हा दात डॉक्टरांनी काढला. या मुलाला भूल दिली गेली. त्यानंतर या मुलाला बालरोगतज्ञांच्या निरिक्षणाखाली ठेवण्यात आलं.

मुलाला जास्त त्रास होता, त्याला श्वास घ्यायला प्रचंड त्रास होत होता, मात्र दात काढताच त्याला खूप आराम मिळाला, त्यामुळे आम्ही देखील चिंतामूक्त झाल्याचं मुलाच्या पालकांनी सांगितलं.

ब्रॉन्कोस्कोपी तंत्रज्ञान नेमकं काय आहे?

ब्रॉन्कोस्कोपी या अतिशय छोट्या तंत्रज्ञानाने फुप्फुसातील सगळ्या रचना पाहता येतात, या यंत्रात अतिशय सुक्ष्म कॅमेरा देखील असतो. नाक अथवा तोंडावाटे हे यंत्र श्वसननलिकेतून थेट फुप्फुसात सोडलं जातं. यामुळे डॉक्टरांना फुप्फुसाचं निरिक्षण करता येतं. तज्ञ डॉक्टरतर्फे ही सगळी प्रोसेजर केली जाते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com