सिडकोचे उपाध्यक्ष लोकेश चंद्र यांची बदली; कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच बदली झाल्याने तर्कवितर्कांना उधाण

सुजित गायकवाड
Tuesday, 18 August 2020

सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक आणि उपाध्यक्ष लोकेश चंद्र यांची बदली करण्यात आली आहे. लोकेश चंद्र यांच्या जागी वैद्यकीय शिक्षण व आरोग्य विभागाचे सचिव डॉ. संजय मुखर्जी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. चंद्र यांचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच त्यांची बदली झाल्यामुळे सिडको वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे. 

नवी मुंबई : सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक आणि उपाध्यक्ष लोकेश चंद्र यांची बदली करण्यात आली आहे. लोकेश चंद्र यांच्या जागी वैद्यकीय शिक्षण व आरोग्य विभागाचे सचिव डॉ. संजय मुखर्जी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. चंद्र यांचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच त्यांची बदली झाल्यामुळे सिडको वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे. 

'त्या' कोसळलेल्या इमारतीच्या जागी दीड वर्षांत उभारणार टॉवर, दुर्घटनेनंतर महिन्याभरात मंजुरी

तत्कालिन व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांना मंत्रालयात पदोन्नती देण्यात आल्यावर त्यांच्या जागेवर 2018 ला लोकेश चंद्र यांची नियुक्ती करण्यात आली होती. तेव्हा पासून चंद्र यांनी गगराणी यांच्या कार्यकाळातील प्रकल्पांना गती देण्याचा प्रयत्न केला होता. आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पातील अडकलेल्या पूर्वनसनला चालना देऊ प्रकल्पाला गती देण्याचा चंद्र यांनी प्रयत्न केला. रखडलेल्या मेट्रो प्रकल्पातील अडचणी दूर करून संथगती दूर केली. चंद्र यांच्या काळातच सिडकोने 15 हजार घरांच्या महागृहप्रकल्पाचा शुभारंभ करता आला. तसेच चंद्र यांच्या कारकिर्दीत तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक लाख घरे बांधण्याची घोषणा केली होती. सिडकोचा कारभार चंद्र यांच्यावर असताना काही दिवसांपूर्वीच त्यांच्यावर कोकण विभागिय आयुक्त पदाचा अतिरीक्त कारभार सोपवण्यात आला होता. परंतू हे कामकाज सुरूळीत असतानाच अचानक लोकेश चंद्र यांची बदली झाली. मात्र बदली करताना त्यांच्या जागेवर नियुक्त केलेले डॉ. संजय मुखर्जी यांच्यासाठी सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालक पदाचा दर्जा अधिक कालीन वेतन श्रेणीत अवनत करून ही बदली करण्यात आल्यामुळे सिडकोच्या वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

बेस्टची कर्मचाऱ्यांवर मोठी कारवाई, 'इतक्या' कर्मचाऱ्यांना केलं बडतर्फ

चंद्र यांच्या जागेवर आता सरकारने डॉ. संजय मुखर्जी यांची नियुक्ती केली आहे. मुखर्जी हे 1996 च्या आयएएस तुकडीतील अधिकारी आहेत. याआधी वैद्यकीय शिक्षण व आरोग्य विभागाचे ते सचिव होते. मुखर्जी यांनी बृह्नमुंबई महापालिकेचे अतिरीक्त आयुक्त म्हणून 4 वर्षे काम केले आहे. त्यांच्या काळात त्यांनी भूमिगत जलवाहिन्या, सागरी किनारा मार्ग आणि मलःनिस्सारण प्रकल्प यशस्वीपणे राबवण्यात आले.

-----------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CIDCO Vice President Lokesh Chandra transferred