esakal | लॉकडाऊनमध्ये सिगारेटची लत पडली महागात; दुकानदाराला गंडवण्याच्या नादात थेट तुरूंगात रवानगी
sakal

बोलून बातमी शोधा

लॉकडाऊनमध्ये सिगारेटची लत पडली महागात; दुकानदाराला गंडवण्याच्या नादात थेट तुरूंगात रवानगी
  • लॉकडाऊनमध्ये दुकानादारांना टोप्या लावून सिगरेटची तलब भागवली
  • -ऑनलाईन पैसे पाठवल्याचे बनावट संदेशांद्वारे फसवणूक
  • -पाच तरुणांना अटक

लॉकडाऊनमध्ये सिगारेटची लत पडली महागात; दुकानदाराला गंडवण्याच्या नादात थेट तुरूंगात रवानगी

sakal_logo
By
अनिश पाटील


मुंबई - लॉकडाऊनमध्ये व्यसनाची साधने मिळणे कठीण झाले होते. सिगरेट सारख्या वस्तू तर दुप्पट किंमतीला विकून दुकानदार आपले खिसे भरत होते. अशाच काळात सिगारेट खरेदी करण्यासाठी दुकानदारांना ऑनलाईन पैसे पाठवण्याचे बनावट संदेश पाठवून टोप्या लावणा-या पाच महाविद्यालयीन तरुणांना ओशिवरा पोलिसांनी अटक केली आहे.

खड्डयांसोबत सेल्फी काढणारी राष्ट्रवादी, आता कुठेय? आशिष शेलार यांची रस्त्यांच्या दुर्दशेवरून टीका
   
ओशिवरा परिसरात राहणारे पाचही आरोपी हे 18 ते 22 वर्ष वयोगटातले असून महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे. मुंबईत कोरोनाच्या पार्श्वभूमिवर मार्चमध्ये सर्वत्र लॉकडाऊन आदेश सरकारने जारी केली होते. त्यात तंबाखू जन्य पदार्थ विकणाऱ्यांवर कडक कारवाईचे आदेश दिल्याने काळ्याबाजारात गुटखा, सिगारेट, तंबाखूची मागणी वाढली. संधीचा फायदा घेऊन दुकानदारही दुप्पट किंमतीने या गोष्टी विकू लागले.  दरम्यान या प्रकरणातील आरोपी जिमित पाचांळ (20), अपूर्व गोहिल (22), भाविक पडियार (22), सागर गाला (24), निसर्ग मस्करीया (19) हे ओशिवरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका दुकानदाराकडून नियमित सिगारेट घ्यायचे, मात्र लॉकडाऊनमुळे दुकानदार सिगारेटची पाकिटे महाग विकत होता. तेवढे पैसे यांना देणं परवडत नसल्यामुळे जून महिना येईपर्यंत त्यांचा खिसा मोकळा झाला होता. मात्र सुटत नाही, त्याला व्यसन म्हणतात. अखेर या पाच जणांनी दुकानदारांना गंडावण्याची नामी युक्ती शोधून काढली. सिगरेटचे पैसे दुकानदाराला पेटीएममवर पैसे पाठवतो, असे सांगून वेगवेगळ्या मोफ़त संकेतस्थळावरुन बनावट संदेश तयार करून, विक्रेत्यांच्या मोबाईलवर रक्कम  पाठविल्याचा संदेश पाठवण्यास या तरुणांनी सुरूवात केली. कामाच्या गडबडीत दुकानदारही पैसे आल्याचा संदेश पाहून त्यांना सिगरेट देत होते.  

आयआयटी पवईत कामादरम्यान मार्बलच्या लाद्या अंगावर पडून दोन कामगारांचा मृत्यू

एकदा चोरीचा डाव पचला म्हणून या पाचही तरुणांनी मग दुकानदाराकडून सिगारेटची पाकिटं घेत, त्याला टोपी घालायला सुरूवात केली. दरम्यान ऑगस्ट महिन्यात ज्या वेळी दुकानदार बँकेत पासबुकची इंट्री केली. त्यावेळी त्या मुलांनी पाठवलेल्या पैशांची नोंद दिसून आली नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर दुकानदाराने ओशिवरा पोलिस ठाण्यात पाचही आरोपींविरोधात भा.द.वी कलम 420, 465, 467,471, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला. या प्रकरणी ओशिवरा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दयानंद बांगर, पोलीस निरीक्षक  रघुनाथ कदम यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक तुषार सावंत व पोलीस हवालदार दयानंद साटम, लक्ष्मण बागवे,  पोलीस नाईक विनोद माने, पोलीस शिपाई किरण बारसिंग , उमेश सोयंके , कमरुलहक शेख , मनीष सकपाळ आणि संग्राम जाधव  यांच्या पथकाने उत्कृष्ट तपास करून या पाचही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

------------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

loading image