मोखाडा - मोखाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत रात्री गस्तीवर असलेल्या पथकाला सोमवारी 21 जुलैला मध्य रात्री 2 वाजेच्या दरम्यान मोखाडा त्र्यंबकेश्वर रोडवर क्रेटा कार भरधाव वेगाने जातांना आढळली. त्यामूळे पोलिस अंमलदार बापू नागरे यांना संशय आल्याने, पोलिस हवालदार शशीकांत भोये यांसह त्यांनी सदर कारचा पाठलाग केला.