BMC अग्निसुरक्षा पालन समिती संशयाच्या धुरात; सिटी सेंटरच्या आगीची चौकशी करणार 

BMC अग्निसुरक्षा पालन समिती संशयाच्या धुरात; सिटी सेंटरच्या आगीची चौकशी करणार 

मुंबई : नागपाडा येथील सिटी सेंटर मॉलची नऊ महिन्यांपूर्वी तपासणी झाली होती. या तपासणीमध्ये पालिकेच्या डी प्रभागाच्या सहाय्यक आयुक्तांसह अग्निशमन अधिकाऱ्यांनी मॉलमधील अग्निप्रतिबंधक यंत्रणा योग्य असल्याचे प्रमाणपत्र दिले होते. त्यामुळे आता अतिरिक्त आयुक्तांमार्फत या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश आज स्थायी समितीने दिले आहेत. शहरातील इमारतींची अग्निसुरक्षा तपासणी करण्यासाठी अग्निसुरक्षा पालन समिती यामुळे संशयाच्या धुरात अडकली आहे. 

नागपाडा येथील सिटी सेंटर मॉलला 22 ऑक्‍टोबर रोजी आग लागली होती. ही आग तब्बल 56 तासांनंतर विझली. मुंबईच्या इतिहासातील ही सर्वाधिक काळ धगधगत राहिलेली आग असल्याने इमारतीतील बेकायदा बांधकाम आणि अग्निसुरक्षेवर प्रश्‍न निर्माण झाला. मात्र नऊ महिन्यांपूर्वीच महापालिकेच्या अग्निसुरक्षा पालन समितीने या मॉलची पाहणी करून अग्निप्रतिबंधक यंत्रणा योग्य असल्याचे प्रमाणपत्र दिले होते. अग्निप्रतिबंधक यंत्रणा योग्य असती तर आग 56 तासांनंतर विझणे शक्‍य नाही, असा आक्षेप सदस्यांनी घेतला आहे. यावर पाहणी केली तेव्हा अधिकाऱ्यांना मॉलमधील बेकायदा बांधकाम दिसले नाही का, असा प्रश्‍न विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी उपस्थित केला आहे. तसेच या प्रकरणाची अतिरिक्त आयुक्तांमार्फत चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. 

मागील आठवड्यात झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत आठ दिवसांत चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. मात्र अद्याप अहवाल दिलेला नाही. त्यातच शहरात लागलेल्या आगीच्या विवरणानुसार या मॉलची तपासणी झाल्याचे स्पष्ट होत आहे. तरीही आग 56 तास विझत नसेल तर ही गंभीर बाब असून, या प्रकरणात अतिरिक्त आयुक्तांमार्फत चौकशी करून 15 दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहे. 
- यशवंत जाधव,
अध्यक्ष, स्थायी समिती, मुंबई महापालिका. 

City Center will investigate the mall fire

------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com