
सामान्य माणसांकडून पाणीपट्टी थकीत राहिली तर आपलं पाणी थेट कापलं जातं. मात्र मंत्री आणि त्यांच्या शासकीय निवास्थानाबाबत वेगळा नियम आहे का?
मुंबई : मुंबईतून महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येतेय. तुमच्या आमच्यासारख्या सामान्य माणसांकडून पाणीपट्टी थकीत राहिली तर आपलं पाणी थेट कापलं जातं. मात्र मंत्री आणि त्यांच्या शासकीय निवास्थानाबाबत वेगळा नियम आहे का? असा प्रश्न मुंबई महापालिकेला विचारण्याची वेळ आता आली आहे. कारण थकीत पाणीपट्टीबाबत माहिती अधिकारातून महत्त्वाची बाब समोर आली आहे
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या 'वर्षा' बंगल्यासकट आणखी इतर अनेक मंत्र्यांच्या बंगल्याची नावे बृहन्मुंबई महानगर पालिकेकडून थकबाकीदार म्हणून घोषित केली गेलीये. महापालिकेकडून घोषित करण्यात आलेल्या यादीत सरकारी बंगल्यांकडून तब्बल चोवीस लाखांपेक्षा अधिकची पाणीपट्टी थकीत असल्याचं घोषित करण्यात आलं आहे.
महत्त्वाची बातमी : शेतकरी आंदोलनाप्रमाणे मराठा आंदोलक मुंबईत देणार धडक, मुंबईच्या वेशीवर पोलसांचा मोठा फौजफाटा
मंत्र्यांच्या शासकीय बंगल्याकडून २४ लाख ५६ हजार ४६९ रुपयांची एकूण थकबाकी शिल्लक आहे. यामध्ये मुख्यमंत्र्यांचा वर्षा बंगला तर आहेच. सोबतच मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षाकर्मींचा तोरणा बंगला देखील आहे. अजित पवार यांचा देवगिरी बंगला, जयंत पाटील यांचा सेवासदन बंगला, नितीन राऊत यांचा पर्णकुटी बंगला, बाळासाहेब थोरात यांचा रॉयल स्टोन बंगला, देवेंद्र फडणवीस यांचा सागर बंगला, अशोक चव्हाण यांचा मेघदूत बंगला, सुभाष देसाई यांचा बंगला, दिलीप वळसे पाटील यांचा शिवगिरी बंगला यासोबतच एकनाथ शिंदे यांचा नंदनवन बंगला, राजेश टोपे यांचा गेट वन बंगला नाना पाटोळे यांचा चित्रकूट बंगला, राजेंद्र शिनगे यांचा सातपुडा बंगला, नवाब मलिक यांचा मुक्तागिरी, छगन भुजबळ यांचा रामटेक बंगला, रामराजे निंबाळकर यांचा अजंठा तसेच सह्याद्री या शासकीय अतिथी गृहाचाही यामध्ये समावेश आहे.
cm bungalows varsha amongst defaulters of BMC government bungalows defaults more than 24 lac rupees