
PM Modi in Mumbai: पंतप्रधानांचं स्वप्न साकारण्यासाठी 1 ट्रिलियन डॉलरची भर टाकणार; CM शिंदेंचं आश्वासन
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज मुंबईच्या दौऱ्यावर असून त्यांनी मुंबईतून शिर्डी आणि सोलापूरला जाणाऱ्या दोन वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा कंदील दाखवला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान मोदींचं कौतुक केलं. तसेच त्यांच्या ५ मिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र १ ट्रिलियन डॉलरची भर टाकेल, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. (CM Eknath Shinde gives promise to contribute 1 trillion dollar by Maharashtra to PM Modi dream)
शिंदे म्हणाले, सर्वप्रथम मी रेल्वे मंत्र्यांचं मनापासून धन्यवाद देतो. या दोन्ही ट्रेनचं लोकार्पण करण्यासाठी पंतप्रधान उपस्थित आहेत, त्याचं मी स्वागत करतो. मी तुमचं अभिनंदनही करतो गेल्या आठवड्यात झालेल्या गोबल सर्व्हेमध्ये आपले पंतप्रधान एक नंबरवर आहेत. ही देशवासियांसाठी गर्वाची बाब आहे.
हे ही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार
महाराष्ट्रातीला रेल्वेला १३,५०० कोटी कधीही मिळाले नव्हते
मुंबई ते सोलापूर आणि मुंबई ते शिर्डी या दोन वंदे भारत ट्रेनचं आज उद्गाटन झालं. हे महाराष्ट्रासाठी मोठं पाऊल आहे. रेल्वेचं सर्वात मोठं नेटवर्क आहे, गेल्या अनेक काळापासून हा विभाग दुर्लक्षित होता. या विभागानं गेल्या ९ वर्षात गरीबांपासून सर्वांच्या फायद्याचं लक्ष दिलं. महाराष्ट्राला १३,५०० कोटी रुपये कधीही मिळाले नव्हते, असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
महाराष्ट्राकडून १ ट्रिलियन डॉलर देणार
दरम्यान, यंदाच्या केंद्रीय बजेटमध्ये महाराष्ट्राला खूपच फायदा झाला आहे. त्यामुळं तुम्ही असंच पुढे लक्ष राहू द्यावं. आपलं ५ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याचं जे स्वप्न आहे, त्यात आमचं जे १ ट्रिलियन डॉलरचं टार्गेट आहे, त्याची भर टाकण्याचा प्रयत्न करु. त्यासाठी महाराष्ट्राच्या १३ कोटी जनतेकडून तुमचं अभिनंदन, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोदींना अश्वस्त केलं.