नव्याने काही कक्षांची भर पडत असल्याचे पाहून खडबडून जागे झालेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाने हे सर्व कक्ष बंद करण्याचा प्रस्ताव सादर केला होता.
मुंबई : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (Public Works Department) कासव गती कामावर बोट ठेवत काही विभागांनी आपले स्वतंत्र बांधकाम कक्ष स्थापन केले आहेत. त्याच नव्याने काही कक्षांची भर पडत असल्याचे पाहून खडबडून जागे झालेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाने हे सर्व कक्ष बंद करण्याचा प्रस्ताव सादर केला होता. त्याला १३ फेब्रुवारी २०२५ रोजी मुख्यमंत्र्यांनी (Devendra Fadnavis) मंजुरी दिली असून डिसेंबर २०२५ पर्यंत हे सर्व कक्ष बंद करण्याचे निर्देश दिले आहेत.