Dasara Melava 2023 : CM शिंदेच्या दसरा मेळाव्यात मराठा आंदोलकांचा धसका; काळे कपडे घातलेल्यांना नाकारला प्रवेश

सभेच्या प्रत्येक गेटवर काळे कपडे घालणाऱ्यांना सभेच्य़ा स्थळापासून दूर ठेवण्यात आले.
Dasara Melava 2023 : CM शिंदेच्या दसरा मेळाव्यात मराठा आंदोलकांचा धसका; काळे कपडे घातलेल्यांना नाकारला प्रवेश

मुंबई : राज्यात मराठा अरक्षणाची धग कायम आहे. ठिकठीकाणी राजकीय नेत्यांच्या सभांमध्ये मराठा बांधवांकडून काळे झंडे दाखवून आंदोलन केले जात आहे. त्य़ाचा धसका घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्यात दिसून आला. आझाद मैदानात सभेत पोहचणाऱ्या प्रत्येक नागरिकांना तपासण्यात आले. काळे कपडे दिसल्यास त्यांना सभास्थळी प्रवेश नाकारण्यात आला. सभेच्या प्रत्येक गेटवर काळे कपडे घालणाऱ्यांना सभेच्य़ा स्थळापासून दूर ठेवण्यात आले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना गटाचा दुसरा मेळावा आझाद मैदानावर मंगळवारी (ता.२४) पार पडला. मेळाव्यासाठी नागरिकांना राज्याच्या कानाकोपऱ्यातून खासगी बसेस, एसटी महामंडळाच्या बसेसने सभेच्या ठिकाणी आझाद मैदानावर आणण्यात आले. यामध्ये सर्वाधिक नागरिक ठाणे, पालघर भागातील होते. मात्र, यात सभेच्या ठिकाणी चुकूनमाकून काळे कपडे घालून येणाऱ्या नागरिकांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला त्यामुळे नागरिकांना सभेसाठी येऊनही आझाद मैदानाच्या बाहेरच बसण्याची वेळ आल्य़ाचे दिसून आले.

Dasara Melava 2023 : CM शिंदेच्या दसरा मेळाव्यात मराठा आंदोलकांचा धसका; काळे कपडे घातलेल्यांना नाकारला प्रवेश
Dasara Melava 2023 : राज ठाकरेंची स्तुती केल्याने आनंद दिघेंचे पंख छाटले; CM शिंदेचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप

आझाद मैदानाबाहेर रस्ते मोकळेच

सभेच्या ठिकाणी नागरिकांसाठी टाकण्यात आलेल्या बहुतांश खुर्च्या रिकाम्याच होत्या तर आझाद मैदानाबाहेर चौफेर असलेले रस्ते आणि नागरिकांच्या मुख्य प्रवेशाद्वारापुढील रस्ते सुद्धा मोकळेच दिसून आले.

बसेस मिळेना

नागरिकांना सभेच्या ठिकाणी पोहचवतांना नागरिकांना थेट आझाद मैदानाच्या गेटवर सोडण्यात आले. त्यानंतर आझाद मैदानाच्या दुरवर वाहनांची पार्किंग देण्यात आली होती. त्यामुळे वर्धा, गडचिरोली,चंद्रपुर, वाशिम, नंदुरबार, बीड महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पहिल्यांदाच मुंबईत येणाऱ्या नागरिकांना परतीच्या मार्गावर प्रचंड त्रास सहन करावा लागला.

Dasara Melava 2023 : CM शिंदेच्या दसरा मेळाव्यात मराठा आंदोलकांचा धसका; काळे कपडे घातलेल्यांना नाकारला प्रवेश
Dasara Melava: शिंदेंच्या दसरा मेळाव्यात जळगाव स्पेशल शेवभाजी, खुद्द मंत्री महोदयांचा स्वयंपाकाला हातभार

पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

आझाद मैदानाच्या चौफेर रस्त्यांवर पोलीसांचा तगडा बंदोबस्त दिसून आला. मुंबईतील पोलीसांसह मुंबई बाहेरील पोलीसांना सुद्धा दसरा मेळाव्याच्या सुरक्षेसाठी पाचारण करण्यात आले होते. त्याशिवाय मुंबई बाहेरून य़ेणाऱ्या नागरिकांना रस्ते सांगण्य़ासाठी आणि रस्त्यांवर वाहतुक कोंडी होऊ नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस दिसून आले.

सभेत पोहचणाऱ्या नागरिकांच्या अल्पोहारासाठी रांगा

मुंबई बाहेरून आलेल्या नागरिकांसाठी सभेच्या प्रत्येक प्रवेशद्वारावर अल्पोहाराची सोय करण्यात आली होती. वडापाव आणि पाण्याची बाटली वाटण्यात आली. मात्र सभेच्य़ा ठिकाणी पोहचणाऱ्या नागरिकांच्या गर्दीमूळे अल्पोहाराच्या ठिकाणी रांगा लागल्या होत्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com