Rajyasabha Elections 2022 | 'मविआ'च्या नेत्यांची मुख्यमंत्र्यांसोबत तातडीची बैठक; मुंबईत घडामोडींना वेग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MVA sharad pawar and uddhav thackeray and thorat
'मविआ'च्या नेत्यांची मुख्यमंत्र्यांसोबत तातडीची बैठक; मुंबईत घडामोडींना वेग

'मविआ'च्या नेत्यांची मुख्यमंत्र्यांसोबत तातडीची बैठक; मुंबईत घडामोडींना वेग

राज्यात सध्या राज्यसभा निवडणुकीवरून चांगलीच खलबतं सुरू आहेत. राज्यसभेसाठीचे उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आज दुपारी तीन वाजता संपत आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्यसभेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी मविआच्या नेत्यांचं शिष्टमंडळ देवेंद्र फडणवीसांच्या (BJP leader Devendra Fadnavis) भेटीला गेलं होतं. पण निवडणूक बिनविरोध कऱण्याचा प्रस्ताव भाजपाने फेटाळल्याने आता मुंबईत घडामोडींना वेग आला आहे.

हेही वाचा: महाविकास आघाडीच्या प्रस्तावावर फडणवीसांची 'ऑफर', थेट दिल्लीला फोन

आज संध्याकाळी ६ वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी महाविकास आघाडीतल्या (Mahavikas Aghadi Government) नेत्यांची बैठक बोलावली आहे. त्यामुळे आता कोणती नवी सत्ता-समीकरणं घडणार? या बैठकीत कोणता मोठा निर्णय घेणार याकडे राज्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे. राज्यसभा बिनविरोध कऱण्याचा प्रस्ताव घेऊन छगन भुजबळांसह महाविकास आघाडीचे प्रमुख नेते 'सागर'वर फडणवीसांच्या भेटीला गेले होते. त्यावेळी राज्यसभा निवडणूक बिनविरोध करण्याची मागणी या नेत्यांनी भाजपाकडे केली. याच मागणीला काऊंटर करत फडणवीसांनी बाजी पलटवली आणि मविआकडे राज्यसभा बिनविरोध करण्याची मागणी केली.

हेही वाचा: फडणवीसांसोबत बैठक संपताच मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय, अपक्ष आमदारांसोबत...

राज्यसभा निवडणुकीत घोडेबाजार होण्याचा आरोप याआधीही झाला होता. शिवसेनेच्या संजय राऊतांनीही हे बोलून दाखवलं होतं. त्या पार्श्वभूमीवर दगाफटका टाळण्यासाठी आता मविआने आमदारांना मुंबईतल्या ट्रायडंट हॉटेलमध्ये येऊन राहण्य़ाचे आदेश दिले आहेत. ८ ते १० जून या काळात या आमदारांना हॉटेलमध्ये राहण्यास सांगितलं आहे. दरम्यान, ६ जून रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सर्व अपक्ष आमदारांची बैठक बोलावली आहे. त्यावेळीही खलबतं होणार आहेत.

Web Title: Cm Uddhav Thackeray Meeting In Mumbai With Mahavikas Aghadi Leaders

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top