कॅबिनेटच्या निर्णयाला नवी मुंबई काँग्रेसचा विरोध

बहुसदस्य पद्धती विरोधात निरीक्षक एच. के पाटील यांच्याकडे दिले निवेदन
congress
congresssakal media

नवी मुंबई : राज्यातील महापालिकांच्या आगामी निवडणुका (municipal elections) बहुसदस्यीय पद्धतीने करण्याच्या निर्णयावर राज्यमंत्री मंडळाने निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे (Government decision) नवी मुंबई काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक (Anil kaushik) यांनी विरोध केला आहे. काँग्रेसचे राज्याचे निरीक्षक एच. के पाटील यांची (H.K patil) भेट घेत नवी मुंबईतील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी बहुसदस्यीय पद्धतीला प्रखर विरोध केला आहे. तसेच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (nana Patole) , महसुल मंत्री बाळासाहेब थोरात (balasaheb thorat) यांनाही भेट घेऊन विरोध केला आहे. परंतु त्यानंतरही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav Thackeray) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी काँग्रेसच्या नेत्यांचे म्हणणे न मानल्याने काँग्रेसमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे.

congress
मुंबईत सक्रिय रुग्णांचा आलेख चढाच!

नवी मुंबई महापालिकेच्या २०२० च्या मे महिन्यात मुदत संपली आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने त्याआधीच नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या दिशेने प्रक्रियेला सुरुवात केली होती. महापालिकेची निवडणूक ही एक सदस्यीय पद्धतीने होणार असे आयोगाने जाहीर केले होते. त्यानुसार प्रभाग संरचना बदलून नव्याने तयार करण्यात आल्या. प्रभाग रचना जाहीर करण्यात आल्या. तसेच मतदार याद्याचा प्रारूप मसुदा जाहीर करून त्यावर हरकती व सुनावणींचा कार्यक्रम सुरु होता. महापालिकेच्या निवडणूक विभागाने निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व तयारी करून अंतिम टप्प्यात पोहोचली होती. फक्त निवडणूक आयोगाकडून आचारसंहितेचा कार्यक्रम घोषित होणे बाकी होते.

महापालिकेची तयारी एवढ्यावर आली असतानाच मध्ये कोविडने पुन्हा डोके वर काढल्याने आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम अनिश्चित काळाकरिता रद्द केला. एकीकडे निवडणुकीची प्रक्रीया सुरु असताना शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने महाविकास आघाडीच्या नावाने प्रचार करण्यास सुरुवात केली होती. जाहीर प्रचार, पार्ट्या झडू लागल्या होत्या. भाजपनेही मोर्चेबांधणी करण्यास जोरदार सुरवात केली होती. अशा परिस्थितीत आता पुन्हा बहुसदस्यीय पद्धतीने निवडणूक होणार असल्याने महापालिकेच्या अधिकाऱ्यांना पुन्हा नव्याने प्रभाग रचना कराव्या लागणार आहेत. त्याचा फटका काँग्रेससह राष्ट्रवादी व शिवसेनेलाही बसणार असल्याने त्यांच्याही काही नेत्यांकडून दबक्या आवाजात नाराजीचा सुर उमटत आहे.

भाजपला फायदा

"नवी मुंबईच्या आगामी महापालिका निवडणूक बहुसदस्यीय पद्धतीने घ्या अथवा एक सदस्यीय पद्धतीने घ्या. भाजप सर्व पद्धतीने निवडणूक लढविण्यास सज्ज आहे. निवडणूक होणे हे आमच्यासाठी अधिक गरजेचे आहे. सद्या महापालिकेत प्रशासकाच्या कारभाराखाली अनेक असांविधानिक कामे सुरु आहेत. त्यामुळे निवडणूक होऊन सर्व लोकप्रतिनिधी महापालिकेच्या सदनात जाणे गरजेचे आहे."

- रामचंद्र घरत, भाजप, जिल्हाध्यक्ष नवी मुंबई

"राष्ट्रवादालाही या निर्णयाचा फायदाच होणार आहे. आम्ही निवडणुकीच्या अनुषंगाने तयार आहोत. आमच्या पक्षाने संपूर्ण नवी मुंबईत तयारी केलेली आहे. त्यानुसारच पक्षश्रेष्ठींनी हा निर्णय घेतला आहे."

- अशोक गावडे, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com