esakal | मातोश्रीवर कोरोनाची पुन्हा धडक! तेजस ठाकरे यांच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना केले क्वारंटाईन...
sakal

बोलून बातमी शोधा

मातोश्रीवर कोरोनाची पुन्हा धडक! तेजस ठाकरे यांच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना केले क्वारंटाईन...

कोरोनाने पुन्हा ‘मातोश्री’वर थाप दिली आहे. मुंख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे धाकटे चिरंजीव तेजस ठाकरे यांच्या दोन सुरक्षा रक्षकांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे

मातोश्रीवर कोरोनाची पुन्हा धडक! तेजस ठाकरे यांच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना केले क्वारंटाईन...

sakal_logo
By
सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबई – राज्यात दिवसेंदिवस कोरोनाची आकडेवारी वाढत असताना मुंबईचाही आलेख काही कमी होताना दिसत नाही. राज्यातील महत्वाच्या नेत्यांनाही कोरोनाची लागण झाली होती. त्यात आता वाद्रांतील मुख्यमंत्र्यांच्या घराजवळ कोरोना येऊन ठेपला आहे. त्याचे कारण म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कलानगर येथील ‘मातोश्री’ या निवासस्थानाबाहेरील गेटवर सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत असलेल्या तीन पोलिसांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यानंतर इतर कर्मचाऱ्यांच्या चाचण्या करीत त्यांना 14 दिवस क्वॉरंटाईन करण्यात आल होते. आता कोरोनाने पुन्हा ‘मातोश्री’वर थाप दिली आहे. मुंख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे धाकटे चिरंजीव तेजस ठाकरे यांच्या दोन सुरक्षा रक्षकांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. या सुरक्षा रक्षकांच्या संपर्कात आलेल्या कर्मचाऱ्यांचीही कोरोना चाचणी करण्यात आली आहे.

सुशांतच्या आत्महत्येवर आधारित सुसाईड ऑर मर्डर सिनेमाचा फर्स्ट लूक रिलीज, सप्टेंबरमध्ये सुरु होणार शूटींग

तेजस ठाकरे हे मुख्यमंत्र्यांचे धाकटे चिरंजीव असल्याने त्यांना वाय प्लस सुरक्षेची व्यवस्था करण्यात आली आहे. वाय प्लस सुरक्षा ताफ्यातील दोन सुरक्षा रक्षकांचा कोरोन रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे ताफ्यात कार्यरत असलेल्या इतर सुरक्षा रक्षकांचीही तातडीने कोरोना चाचणी करण्यात आली आहे. या इतर सुरक्षा रक्षकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.

‘मातोश्री’जवळ कोरोनाने थाप दिल्याची ही तिसरी घटना म्हणता येईल. कारण ‘मातोश्री’ समोरील चहाविक्रेत्याला कोरोना संसर्ग झाला होता. त्यानंतर तीन पोलिस सुरक्षा रक्षकांना आणि आता तेजस ठाकरे यांच्या सुरक्षा रक्षकांना!

मनसेची ठाकरे सरकारवर टीका, म्हणतात...गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्यांना अडचणी

मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवास्थान असलेल्या ‘वर्षा’ बंगल्यावर सुरक्षेसाठी तैनात असलेल्या महिला सहाय्यक पोलिस निरिक्षकालाही कोरोनाची बाधा झाली होती. या महिला पोलिसालाही तत्काळ योग्य उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. आता तेजस यांच्या ताफ्यातील सुरक्षा रक्षकांमुळे ‘मातोश्रीची’ चिंता पुन्हा वाढली आहे.

------------------------------------

संपादन - तुषार सोनवणे

loading image
go to top