मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चैत्यभूमीवर जाणार नाहीत ? काय खरं, काय खोटं?

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 डिसेंबर 2019

उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे चैत्यभूमीवर जाणार नाहीत अशा बातम्या पसरवल्या जातायत. याबद्दलची अधिक चौकशी मुख्यमंत्री कार्यालयात केली असता याबद्दलची स्पष्टता आली आहे. 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ६३ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येनं आंबेडकरी अनुयायी मुंबईत दाखल झालेत. अशातच उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सकाळीच चैत्यभूमीवर जाणार आहेत. मात्र, उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे चैत्यभूमीवर जाणार नाहीत अशा प्रकारच्या बातम्या पसरवल्या जातायत. याबद्दलची अधिक चौकशी मुख्यमंत्री कार्यालयात केली असता अशा बातम्या धादांत खोट्या असल्याची माहिती आता समोर आलीये. 

आणखी वाचासत्ता स्थापनेनंतर पहिल्यांदाच होणार नरेंद्र मोदी-उद्धव ठाकरे भेट; पण कुठं?

विधानसभेचे निकाल लागल्यानंतर भाजप आणि शिवसेनेतील संबध कमालीचे ताणले गेलेत. अशातच शिवसेनेने राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस सोबत घरोबा केलाय. याच प्राश्वभूमिवर मुद्दामून शिवसेनेच्या विरोधात आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधातील बातम्या पसरवल्या जात असल्याचं बोललं जातंय. मुख्यत्त्वे भाजपच्या काही कार्यकर्त्यांकडून हे अतिशय खालच्या दर्ज्याचं राजकारण केलं जातंय अशी देखील सूत्रांकडून माहिती मिळतेय.

मुख्यमंत्री कार्यालयातून मिळालेल्या माहितीच्या आधारे उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सकाळी पावणे आठ वाजता चैत्यभूमीवर येऊन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ६३ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करणार आहेत. 

आणखी वाचा :  ''भारत आता मुस्लिमांचा देश राहिलेला नाही''

दरम्यान उद्या कुणाचीही गैरसोय होऊ नये, यासाठी मुंबई महानगरपालिकेने चैत्यभूमी तसंच शिवाजी पार्क या ठिकाणी पुरेशा सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या. बेस्टनंही विशेष बसची सोय करून दिलीय. त्याशिवाय परिसरात पुरेशी दिवाबत्ती, शौचालयं, रूग्णवाहिका, भिक्खू निवास यांचीही सोय करण्यात आलीय. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या सकाळी चैत्यभूमीवर जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करणार आहेत.

Webtitle : cm uddhav thackeray will not go to dadar chaitya bhoomi are nothing but rumours


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cm uddhav thackeray will not go to dadar chaitya bhoomi are nothing but rumours