नवाबभाई वेल डन : मुख्यमंत्री ठाकरे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

cm udhhav thakre
नवाबभाई वेल डेन

नवाबभाई वेल डन : मुख्यमंत्री ठाकरे

मुंबई : गेल्या महिनाभरापासून क्रूझ पार्टी प्रकरणासह विविध मुद्यांवर अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी, त्यांचे अधिकारी आणि भाजप नेत्यांवर ज्या पद्धतीने हल्ले चढवले. तसेच भाजपने केलेल्या प्रतिहल्ल्यांचा सामना केला. त्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मंत्रिमंडळ बैठकीत ‘नवाबभाई वेल डेन’ म्हणत मलिकांचे कौतुक केले. महाराष्ट्राला बदनाम करण्याच्या षडयंत्रात मलिक यांनी केंद्रीय यंत्रणांचा पर्दाफाश केला. याबाबत आम्ही पाठीशी असल्याचे सांगत मंत्रिमंडळातील सर्व सदस्यांनी मलिकांना एकमुखी पाठिंबा दर्शविला.

बुधवारी कॅबिनेट बैठकीसाठी पोहचलेल्या मलिकांचे मंत्रिमंडळातील सर्व सहकारी मंत्र्यांनी त्यांचे कौतुक करत आम्ही सर्वजण आपल्या पाठीशी असल्याची ग्वाही दिली. भाजपला जशास तसे उत्तर देण्याची गरज असून, आपण कोणतीही भीती व तमा न बाळगता त्यांना उत्तर देत आहात असे सांगितले. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुद्धा ''वेल डन, तुम्ही उत्तम लढाई लढत आहात. महाविकास आघाडी म्हणून आम्ही सर्व जण आपल्या पाठीशी आहोत'' अशा शब्दात कौतुक केले.

हेही वाचा: पेट्रोल-डिझेल वर चालणाऱ्या गाड्यांचे उत्पादन बंद करणार 'या' कंपन्या

फडणवीसांनी आरोप थांबविल्यास शांत राहीन
संजय राऊत यांच्या चिखलफेक थांबवण्याचा सल्ल्याबाबत नवाब मलिक म्हणाले की, मी कोणत्याही पक्षाच्या अथवा एनसीबीसारख्या संस्थांच्या विरोधात नाही. ज्यांनी चुकीचे काम केले, खंडणी वसुलीचे रॅकेट चालवले. त्यांच्याविरोधात माझी लढाई आहे आणि ती सुरू ठेवणार आहे. देवेंद्र फडणवीस यांनी माझ्यावर आरोप केल्याने मी त्यांना केवळ प्रत्युत्तर दिले आहे. माझ्याकडे अजून भरपूर दारूगोळा आहे. पण देवेंद्र यांनी माझ्यावर खोटे आरोप करण्याचे बंद केले तर मी सुद्धा शांत राहीन.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Mumbai News
loading image
go to top