Assembly Session: आधी उद्धव ठाकरे अन् आता आदित्य ठाकरे; फडणवीसांशी भेटीचा योगायोग! लॉबीमध्ये नेमकी काय चर्चा झाली?

Aditya Thackeray and Devendra Fadanavis Meet:देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे यांची लॉबीमध्ये भेट झाली आहे. यावेळी विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे देखील उपस्थित होते.
Aditya Thackeray and  Devendra Fadnavis
Aditya Thackeray and Devendra Fadnavis

मुंबई- दोन दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची लिफ्टजवळ भेट झाली होती. या भेटीवरून राजकीय वर्तुळात चांगलाच धुराळा उडाला होता. आता देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे यांची लॉबीमध्ये भेट झाली आहे. यावेळी विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे देखील उपस्थित होते. त्यांच्या या भेटीची आता चर्चा सुरु झाली आहे.

विधानपरिषदेच्या उमेदवारांचे अर्ज भरले जात होते. यावेळी आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे समोरासमोर आले होते. यावेळी या दोघांमध्ये हास्यविनोद झाला. दोघांनी एकमेकांना शुभेच्छा देखील दिल्या आहेत. काही सेकंदाची ही भेट होती. पण, या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना सुरुवात झाली आहे.

Aditya Thackeray and  Devendra Fadnavis
Ambadas Danve: शिवीगाळ प्रकरणी अंबादास दानवे यांच्यावर कारवाई! सभागृहातून 5 दिवसांचे निलंबन

आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची लॉबीमध्ये ही भेट होत असतानाच दुसरीकडे आणखी एक भेट महत्त्वाची ठरली. उद्धव ठाकरे यांचे विश्वासू मिलिंद नार्वेकर आणि भाजप नेते प्रवीण दरेकर यांची भेट झाली आहे. नुसतीच भेट नाही तर एकमेकांच्या खांद्यावर हात टाकून दिर्घ चर्चा देखील झाली आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात नेमकं काय सुरु आहे असा प्रश्न पडत आहे.

Aditya Thackeray and  Devendra Fadnavis
Prasad Lad-Ambadas Danve: 'आम्ही ज्यांना मातोश्री म्हणायचो, त्या...'; प्रसाद लाड यांनी दानवेंवरून उद्धव ठाकरेंना केलं लक्ष्य

उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात झालेल्या भेटीमुळे चांगलीच चर्चा झडली होती. यावेळी प्रवीण दरेकर देखील उपस्थित होते. ठाकरे आणि फडणवीस यांच्यामध्ये हास्यविनोदाच्या वारंवार घडत आहेत. त्यामुळे हा योगायोग चर्चेचा विषय ठरला आहे. शिवाय, 'नाना करते प्यार तुम्ही से कर बैठे' असं काही आमच्यात होणार नाही अशा प्रकारची मिश्कील टिप्पणी उद्धव ठाकरे यांनी दिली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com