Mumbai : 'कंगना राणावतविरोधात न्यायालयात तक्रार' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कंगना राणावत
कंगना राणावत विरोधातन्यायालयात दाखल

'कंगना राणावतविरोधात न्यायालयात तक्रार'

मुंबई : स्वातंत्र्य चळवळीबाबत वादग्रस्त विधान केल्याच्या आरोपात अभिनेत्री कंगना राणावतविरोधात आज राष्ट्रवादी काँग्रेसचे युसुफ पठाण यांनी महानगर दंडाधिकारी न्यायालयात तक्रार दाखल केली. कंगनाच्या स्वातंत्र्यासंबंधित आणि शीख समुदायासंबंधित विधानांनंतर मुंबईसह देशभरात फौजदारी तक्रारी दाखल होत आहेत.

पठाण यांनी केलेल्या तक्रारीत कंगनाविरोधात न्यायिक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. राष्ट्रद्रोह आणि जाणीवपूर्वक सामाजिक शांतता भंग करणे, या आरोपांखाली तिच्यावर कारवाई करण्याची मागणी तक्रारीत केली आहे. मालाड पोलिस ठाण्यात याबाबत प्रारंभी तक्रार केली होती; मात्र पोलिसांनी दखल न घेतल्यामुळे त्यांनी ॲड. डी. व्ही. सरोज यांच्यामार्फत न्यायालयात तक्रार केली, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

loading image
go to top