esakal | मुंडे यांच्याविरोधात तक्रारीचा वाद सामंजस्याने सोडवणार; उच्च न्यायालयात हमीपत्र दाखल
sakal

बोलून बातमी शोधा

मुंडे यांच्याविरोधात तक्रारीचा वाद सामंजस्याने सोडवणार; उच्च न्यायालयात हमीपत्र दाखल

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात बलात्काराची तक्रार दाखल करणाऱ्या महिलेने आपापसातील वाद सामंजस्याने सोडवण्यासाठी गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयात हमीपत्र दाखल केले.

मुंडे यांच्याविरोधात तक्रारीचा वाद सामंजस्याने सोडवणार; उच्च न्यायालयात हमीपत्र दाखल

sakal_logo
By
सुनिता महामुणकर

मुंबई  : सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात बलात्काराची तक्रार दाखल करणाऱ्या महिलेने आपापसातील वाद सामंजस्याने सोडवण्यासाठी गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयात हमीपत्र दाखल केले. संबंधित तक्रारदार महिलेने मुंडे यांचे आणि स्वतःचे काही फोटो समाजमाध्यमावर अपलोड केले होते. तसेच त्यांच्यावर लैंगिक शोषण आणि बलात्काराचा आरोपही करण्यात आला होता.

मुंबई, ठाणे, रायगड, पालघर परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

मुंडे यांनी यासंबंधात दोघांची सहमती होती असे जाहीरपणे मान्य केले होते. तसेच महिलेविरोधात न्यायालयात मानहानीचा दावा केला होता आणि नुकसान भरपाईची मागणी केली होती; मात्र काही दिवसांतच महिलेने फिर्याद मागे घेतली. आज न्यायमूर्ती के. के. मेनन यांच्यापुढे याचिकेवर सुनावणी झाली. न्यायालयात दोन्ही पक्षकारांनी तडजोड झाल्याचे सांगितले आहे. तसेच मध्यस्थामार्फत यावर सुनावणी घेण्यासाठी तयारी दर्शवली. मध्यस्थाचा खर्च मुंडे करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. समाज माध्यमावर याबाबत फोटो टाकण्यास न्यायालयाने यापूर्वी मनाई केली आहे. 

-------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Complaints against Munde will be settled amicably Filed a guarantee in the High Court mumbai