Jitendra Awhad : तर, माझ्या संपत्तीची खुली चौकशी करा

स्वत:च्या स्वार्थासाठी आणि आव्हाडाला अडकविण्यासाठी छोट्या कार्यकर्त्याला आत्महत्या करायला भाग पाडू नका. मला अडकावयचे असेल तर मी तयार आहे.
jitendra awhad
jitendra awhadsakal
Updated on

ठाणे - स्वत:च्या स्वार्थासाठी आणि आव्हाडाला अडकविण्यासाठी छोट्या कार्यकर्त्याला आत्महत्या करायला भाग पाडू नका. मला अडकावयचे असेल तर मी तयार आहे, करा माझ्या संपत्तीची खुली चौकशी करा असे थेट आव्हान राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार गटाला दिले. पुन्हा परमार आणि जमील शेक होऊ देऊ नका, कोणाला त्रास देऊन आमत्हत्या करायला भाग पाडू नका अशी कळकळीची विनंती देखील आव्हाड यांनी केली.

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे स्वीय सहाय्यक अभिजित पवार यांनी अजित पवार गटात प्रवेश केला होता. त्यानंतर अवघ्या दोनच दिवसात पवार यांनी घरवापसी केली. या संदर्भात ठाण्यात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मुंब्य्रातील नेते शमीम खान याला सुध्दा त्रास दिला जात आहे.

कधी दुबईवरुन, कधी इनकम टॅक्स तर कधी ईडीच्या धमक्या दिल्या जात असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. जमील शेखच्या हत्याचा तपास पुन्हा सुरु करा, त्याचा तपास हिम्मत असेल तर नितीन ठाकरे या पोलीस अधिकाºयाकडे द्या असे आव्हानही त्यांनी केले. आज महापालिकेत कोणतेही पद नसताना कॅबीन वापरली जात आहे, त्यासाठी पालिकेचे कर्मचारी जुंपलेले असता, हे महापालिका आयुक्तांना दिसत नाही का?

असा सवाल करीत शहर विकास विभागात जायचे सर्वांच्या कुंडल्या काढायच्या आणि त्यांना घाबरविण्याचे काम करायचे एवढेच काम शिल्लक राहिले आहे. केवळ आपल्याला आमदार व्हायचे आहे, म्हणून धमकावून, घाबरवून स्वत:च्या गटात घेण्याचे घाणेरडे राजकारण केले जात असून हे अजित पवार यांना दिसत नाही का? असा सवालही त्यांनी केला.

दरम्यान, ठाणे जेलमध्ये हत्येचा आरोपी असलेल्याला फोन आणि जेवण पुरविले जात आहे. जेलमधील कॅटींग देखील राबोडीतील एक जण चालवत असून त्याच्याकडूनच या सुविधा पुरविल्या जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. एकनाथ शिंदे हे पालकमंत्री असतांना त्यांनी देखील याला सहकार्य केले होते. त्यांना कदाचित हे लक्षात आले नसेल की तो आज एक भस्मासुर झाला.

जितेंद्र आव्हाड यांना अडकविण्यासाठीच माझा वापर - अभिजित पवार

अजित पवार गटात जाण्यासाठी माझ्यावर अतिशय दबाव टाकण्यात आला होता. केवळ जितेंद्र आव्हाड यांना अडकविण्यासाठीच माझा वापर केला जाणार होता, असा गंभीर आरोप आव्हाड यांचे स्वीस सहाय्यक अभिजीत पवार यांनी केला. परंतु आव्हाड यांचा फोन आला नसता तर मी आत्महत्या केली असता, असा खळबळजनक दावाही त्यांनी केला.

तसेच आज पुन्हा मी घर वापसी केली असून मरे पर्यंत जितेंद्र आव्हाड हेच माझे नेते असतील असा दावाही त्यांनी केला. माझ्यावर गुन्हा दाखल करुन मला पुन्हा दोन वर्षे जेलमध्ये पाठविण्याचे प्लॅनींग होते, माझ्या मित्रांना देखील पोलीसांकरवी धमक्या दिल्या जात होत्या. ईडीची धमकी दिली जात होती, त्यामुळे अस्वस्थ झालो होतो. नजीब मुल्ला मला फोन लावून देऊन इतरांकरवी धमक्या देण्याचे काम करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com