अर्णब यांना अटक करण्यासाठी आखलं गेलेलं 'ऑपरेशन अर्णब', लहानात लहान गोष्टीचं होतं नियोजन

अर्णब यांना अटक करण्यासाठी आखलं गेलेलं 'ऑपरेशन अर्णब', लहानात लहान गोष्टीचं होतं नियोजन

मुंबई : नुकतीच पत्रकार अर्णब गोवामी यांना रायगड पोलिसांकडून अटक करण्यात आली. २०१८ अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अर्णब गोवामी यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान अर्णब यांना अटक करणं सोपं नसल्याने पोलिसांकडून स्पेशल 'ऑपरेशन अर्णब' राबवलं गेलं. त्यासाठी ४० पोलिसांची विशेष टीम तयार करण्यात आली. कॅबिनेटमधील एका सदस्याकडून एका इंग्रजी वर्तमानपत्राला याबाबतची माहिती देण्यात आली आहे.  

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्या नेतृत्वाखालील राज्याच्या गृह विभागाने २०१८ च्या अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यासाठी कोकण रेंजचे महानिरीक्षक संजय मोहिते यांच्या नेतृत्वाखालील उच्चस्तरीय ४० जणांची टीम तयार केलेली. २०१८ च्या अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात तपास पुन्हा सुरु करण्याची परवानगी मिळाल्यानंतर 'ऑपरेशन अर्णब'ला सुरवात झाली. त्यासाठी तब्बल चाळीस पोलिसांनी फौज तयार करण्यात आली. ज्यात मुंबई आणि रायगड पोलिसांचा समावेश करण्यात आला. संजय मोहिते यांनी संपूर्ण प्लॅन आखला आणि या प्लॅनची अंमलबजावणी करण्याची संपूर्ण जबाबदारी एन्काउंटर स्पेशालिस्ट सचिन वझे यांच्याकडे सोपवण्यात आलेली. मोहिते यांच्या नेतृत्वात असलेल्या टीमसाठी अर्णब यांची अटक करणे एक मोठं आव्हान होतं. आम्ही अत्यंत सावधगिरीने वागलो, आमच्या टीममधील प्रत्येकाने सयंम बाळगला. 

एका कॅबिनेट सदस्याने याबाबत माहिती देताना सांगितले की, आम्ही सुरवातीची तपासणी केली, ज्यामध्ये अर्णब यांचा आत्महत्येच्या गुन्ह्यात सामील असल्याचा पुरावा आम्हाला मिळाला. आमच्या अधिकाऱ्यांनी अर्णब राहत असलेल्या इमारतीच्या अनेकदा फेऱ्या मारल्या. हे अतिशय सिक्रेट मिशन असल्याने जर याबाबत माहिती लीक झाली असती, तर अटक टाळण्यासाठी अर्णब दुसऱ्या शहरात निघून गेले असते अशी भीती पोलिसांना होती. 

पोलिसांनी मुद्दामून सकाळची वेळ निवडली, जेणेकरून अर्णब आपल्या घरीच असतील. या ऑपरेशनमधील प्रत्येक लहानात लहान गोष्टीची काळजी घेण्यात आलेली. अर्णब यांच्या घराची बेल कोण वाजवणार, अर्णब यांच्याशी कोण बोलणार किंवा अर्णब यांनी सहकार्यास नकार दिला तर काय करायचं ? याबद्दल आधीच विचार झालेला. आणि तसेच झालेही. त्यांनतर वझे यांनी अर्णब यांना कायदेशीर बाब समजवली. 

फडणवीस सरकारच्या काळात हे प्रकरण तडकाफडकी बंद करण्याचे सर्वतोपरी प्रयत्न केले गेलेत असं  गृहमंत्री अनिल देशमुख म्हणालेत. जेंव्हा मी एका विधवेचं आणि त्या मुलीचं बोलणं ऐकलं तेंव्हा मला मोठा शॉक बसला. महाराष्ट्रात असं काही होऊ शकतं यावर माझा विश्वास बसला नाही. म्हणूनच हे प्रकरण पुढे नेण्याचं आम्ही ठरवलं. 

भाजपावर, विशेषत: फडणवीसांवर हल्ला चढवताना देशमुख म्हणाले की, सुशांत सिंग राजपूत आत्महत्येचे भाजपने राजकारण केले. सुशांत सिंह केसमध्ये कोणतीही सुसाईड न नव्हती. मात्र इथे सुसाईड नोट असूनही हे प्रकरण दाबलं गेलं. त्यामुळे “आम्ही नाईक कुटुंबाला न्याय मिळवून देऊ,” असे देशमुख म्हणाले. 

confidential operation arnab was a secret mission and how maharashtra police executed it

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com