
महारष्ट्रात गेल्या 21 दिवसापासून सत्तास्थापनेचा पेच कायम आहे. अशातच महाराष्ट्रात पर्यायी सरकार देण्यावर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये चर्चा सुरु आहे. आज राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसमध्ये तब्बल तीन तास चर्चा सुरु होती. यानंतर दोन्ही पक्षांच्या प्रवक्त्यांनी माध्यमांना आजच्या बैठकीबद्दल माहिती दिली.
राष्ट्रपती राजवट लागल्यापासून महाराष्ट्रातील शेतकरी आणि जनतेकडे दुर्लक्ष होतंय अशी भावना नवाब मलिक यांनी मांडली. अशात आज झालेली चर्चा अत्यंत सकारात्मक झाली असं कॉंग्रेसचे जेष्ठ नेते आणि प्रवक्ते पृथ्वीराज चव्हाण यांनी माध्यमांना दिली. अशातच चर्चांचं सत्र आणखी काही दिवस सुरु राहणार आहे.
येत्या काही दिवसात महाराष्ट्राला पर्यायी सरकारच्या माध्यमातून शिवसेना कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या माध्यमातून सरकार स्थापन झालेलं दिसेल असं म्हटलं तर वावगं ठरू नये.
Prithviraj Chavan, Congress on Maharashtra govt formation: Congress-NCP has had long and positive discussions today. Discussions will continue; I am sure we will be able to give a stable govt to Maharashtra very soon. pic.twitter.com/148KbFDhs0
— ANI (@ANI) November 20, 2019
महाशिवआघाडीला काँग्रेस हायकमांड सोनिया गांधींनी हिरवा कंदील दिल्यानंतर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी प्रदीर्घ अशी बैठक पार पडली. या बैठकीमध्ये राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसचे प्रमुख नेते उपस्थित आहेत. यामध्ये शरद पवार, सुप्रिया सुळे, अजित पवार , नवाब मलिक, जयंत पाटील यांच्यासोबत कॉंग्रेसचे मोठे नेते जयराम रमेश, के सी वेणुगोपाल, मल्लिकार्जुन खर्गे, अहमद पटेल यांच्यासोबत सर्व महत्त्वाचे नेते उपस्थित होते.
महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेचा पेच येत्या काही दिवसात सुटताना पाहायला मिळणार आहे. यातच "लवकरच उद्धव ठाकरे गोड बातमी महाराष्ट्राला देतील, त्यामुळे पेढ्यांची ऑर्डर गेलीये असं समजा" असं अत्यंत सूचक विधान शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यानी केलंय. दिल्लीत राऊत यांनी माध्यमांसमोर तसं मत मांडलंय. त्यामुळे लवकरच आता महाशिवआघाडीचं सरकार महाराष्ट्रात स्थापन होणार असं म्हटलं तर वावगं ठरू नये.
WebTitle : congress and ncp meeting over what happened in this meeting