राजभवनाच्या उत्तरावर बाळासाहेब थोरात संतापले, म्हणाले...

बाळासाहेब थोरात
बाळासाहेब थोरात
Summary

१२ आमदारांची नावं रितसर पद्धतीने राजभवनात पाठवण्यात आल्याचीही दिली माहिती

राज्याच्या निवडणुका झाल्या आणि २०१९ मध्ये शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीचे महाविकास आघाडी सरकार सत्तेत आले. त्यानंतर विधान परिषदेसाठी या आघाडीने १२ उमेदवारांची नावे राज्यपालांना दिली. पण त्या १२ नावांचा प्रस्ताव असलेली फाईल सापडत नाही असं स्पष्टीकरण राजपाल्यांच्या कार्यालयाकडून देण्याची आल्याची माहिती आहे. त्यावर, हे उत्तर अतिशय हास्यास्पद आणि आश्चर्यकारक आहे, असे मत राज्याचे मंत्री आणि काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले. (Congress Leader Balasaheb Thorat Angry on Rajbhavan Answer for 12 MLAs)

बाळासाहेब थोरात
"मरण डोळ्यापुढे दिसलं..."; अधिकाऱ्याचा सांगितला भयानक अनुभव

"मंत्रिमंडळ बैठकीमध्ये विधान परिषदेच्या 12 सदस्यांसंदर्भात निर्णय झाला आणि रीतसर पद्धतीने प्रस्ताव दाखल करण्यात आला. पण जर राजभवनातून अशा पद्धतीचे उत्तर येणार असेल तर ही आश्चर्याची बाब आहे आणि हे हास्यास्पददेखील आहे. हे उत्तर अत्यंत चुकीचं आहे. हे उत्तर खरं असेल तर त्यांनी अधिकृतपणे हे उत्तर दिलं पाहिजे आणि फाइल सापडत नाही याबाबत कारवाई व्हायला पाहिजे. तसेच, राज्यपालांनी स्वत: पुढे येऊन या संदर्भातील खुलासा केला पाहिजे आणि जनतेच्या मनातील संभ्रम दूर केला पाहिजे", असे बाळासाहेब थोरात म्हणाले.

"जो प्रस्ताव आम्ही दिला, तो प्रस्ताव त्यांच्याकडे नाही असं कसं होऊ शकतं. यात राजकारण आहे असं म्हणत नाही. पण हे वागणं चुकीचं आहे. राजभवन आणि माननीय राज्यपाल यांनी या संदर्भातील खुलासा दिला पाहिजे", असेही ते म्हणाले.

बाळासाहेब थोरात
मुंबई लोकल ट्रेन १५ जूनपर्यंत बंदच?

चक्रीवादळाबद्दल...

"तौक्ते चक्रीवादळ हे दुसरं वादळ आहे. याच्या आधी निसर्ग चक्रीवादळामुळे मोठं नुकसान झालं होतं. 'तौक्ते'नंतर मुख्यमंत्री आणि इतर नेत्यांनी दौरा केला आहे. मंत्रिमंडळातील विविध सदस्यांनी खूप काम केले आहे. कॅबिनेट बैठकीत नुकसान भरपाई संदर्भातील निर्णय केला जाऊ शकतो. चक्रीवादळात आंब्याचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या ज्या अडचणी होत्या, त्यासाठी त्यांना मदत केली जात आहे. मुख्यमंत्र्यांनी स्वतः परिस्थिती बघितली आहे. अनेक मंत्र्यांनी स्वतः या गोष्टी पाहिल्या आहेत त्याच्यामुळे मंत्रिमंडळ बैठकीमध्ये या संदर्भातला निर्णय घेऊ", असं त्यांनी सांगितलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com