यूपीए व काँग्रेस नेतृत्वाबद्दल शिवसेनेने भाष्य करू नये; कॉंग्रेसनेत्याने संजय राऊतांना सुनावले

यूपीए व काँग्रेस नेतृत्वाबद्दल शिवसेनेने भाष्य करू नये; कॉंग्रेसनेत्याने संजय राऊतांना सुनावले

मुंबई  ः शिवसेना हा यूपीए चा भाग नाही, तसेच काँग्रेसने महाराष्ट्रात शिवसेनेला फक्त किमान समान कार्यक्रमावरच आधारित पाठिंबा दिला आहे. त्यामुळे शिवसेना नेत्यांनी काँग्रेस पक्षाबाबत भाष्य करू नये, अशी समज राज्य काँग्रेसचे उपाध्यक्ष मो. आरीफ (नसीम) खान यांनी दिली आहे. 

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ते कार्यकारी संपादक असलेल्या दै. सामना मधून काँग्रेसवर ताशेरे झोडले आहेत. विरोधी पक्ष मरतुकडा असल्याने दिल्लीतील शेतकरी आंदोलन पेटत नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. संसदेत काँग्रेस हाच प्रमुख विरोधक असल्याने ही टीका प्रामुख्याने काँग्रेसवर केली असल्याचे बोलले जात आहे. त्याखेरीज राऊत यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना काँग्रेसचे नेतृत्व कमकुवत असल्याचेही बोलून दाखवले. सर्वांना बरोबर घेऊन चालणाऱ्या नेत्याची काँग्रेसला गरज असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. राहूल गांधी यांना कोणीही विचारीत नसल्याने अन्य व्यक्तीची त्यांच्याजागी नियुक्ती व्हावी, असे मतही राऊत यांनी व्यक्त केले होते. नसीम खान यांनी समाजमाध्यमांवर व्हिडियो प्रसारित करून त्याचा समाचार घेतला आहे. 

काँग्रेस पक्ष व त्याचे शीर्षस्थ नेते सोनिया गांधी व राहुल गांधी हे पहिल्यापासूनच शेतकऱ्यांच्या बाजूने आहेत. त्यांनी संसदेत व संसदेबाहेरही अनेकदा शेतकऱ्यांचे प्रश्न उपस्थित केले आहेत व मोदींच्या शेतकरी विधेयकाला विरोध केला आहे. युपीए च्या अध्यक्षपदी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची कथित नियुक्ती होण्याबाबतही विनाकारण उलटसुलट चर्चा सुरु करण्यात आली होती. मात्र खुद्द पवार यांनीच त्याचा इन्कार केला होता, असे खान यांनी दाखवून दिले आहे. 

तसेच शिवसेनेला काँग्रेसच्या आणि युपीएच्या बाबींवर भाष्य करण्याचा अधिकार नाही. राज्यात काँग्रेस व शिवसेना (आणि राष्ट्रवादी काँग्रेस) एकत्र सत्तेत असली तरी काँग्रेसचा हा पाठिंबा फक्त किमान समान कार्यक्रमावर आधारित आहेत. शिवसेना ही यूपीएचा भाग नाही, त्यामुळे शिवसेना नेत्यांना यूपीए बद्दल बोलण्याचा अधिकार नाही हे त्यांनी लक्षात ठेवावे, असेही खान यांनी बजावले आहे.

Congress leader Naseem Khans criticism of Sanjay Raut

-------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com