के सी वेणुगोपाल यांनी काढलं पत्रक, मुंबई काँग्रेस नेते संजय निरुपम यांच्याबाबत मोठी बातमी

के सी वेणुगोपाल यांनी काढलं पत्रक, मुंबई काँग्रेस नेते संजय निरुपम यांच्याबाबत मोठी बातमी

मुंबई : मुख्यत्त्वे महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार स्थापित झाल्यानंतर काँग्रेसमधील नेते संजय निरुपम यांनी शिवसेनेसोबत काँग्रेसने केलेली आघाडी अमान्य केली होती. त्यानंतर अनेकदा संजय निरुपम यांनी थेट पक्षविरोधात भूमिका घेत आपली नाराजी देखील व्यक्त केली होती.

मात्र काँग्रेसतर्फे नुकत्याच जाहीर झालेल्या कार्यकारिणीत संजय निरुपम यांना संधी देण्यात आलेली पाहायला मिळतेय. नुकत्याच जाहीर झालेल्या महाराष्ट्र काँग्रेसच्या कार्यकारिणीत आणखी चार उपाध्यक्षांची भर पडल्याची पाहायला मिळतेय. यातील अधीरेखित करण्यासारखी बाब म्हणजे महाराष्ट्र काँग्रेस संसदीय बोर्डाच्या सदस्यपदी संजय निरुपम यांची वर्णी लागली आहे. संजय निरुपम यांच्यासोबत एकनाथ गायकवाड, जनार्दन चांदूरकर यांचीही सदस्यपदी वर्णी लागल्याचं पाहायला मिळतंय. 

संजय निरुपम हे मुंबई काँग्रेस अध्यक्ष देखील राहिलेत. मात्र संजय निरुपम मुंबई काँग्रेस अध्यक्ष असताना निरुपम यांच्याविरोधात तक्रारीचे प्रकार समोर आले होते. त्यानंतर निरुपम यांची मुंबई काँग्रेस पदावरून उचलबांगडी करण्यात आली होती.

गेल्या काही महिन्यांमध्ये संजय निरुपम यांनी थेट शिवसेनेला शिंगावर घेतलेलं पाहायला मिळालंय. दरम्यान आता संजय निरुपम यांची महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीत हजेरी लागल्यानंतर आता निरुपम शिवसेनेबाबत आता कशी भूमिका घेतात हे पाहून महत्त्वाचं ठरणार आहे. 

congress leader sanjay nirupam maharashtra pradesh congress committee parliamentary board

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com