esakal | 'चूक विसरून अजित पवार यांनी परत यावं', 'या' मोठ्या नेत्याचं 'मोठं' वक्तव्य..
sakal

बोलून बातमी शोधा

'चूक विसरून अजित पवार यांनी परत यावं', 'या' मोठ्या नेत्याचं 'मोठं' वक्तव्य..

'चूक विसरून अजित पवार यांनी परत यावं', 'या' मोठ्या नेत्याचं 'मोठं' वक्तव्य..

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेचा पेच सुटल्यात जमा आहे असं वाटत असतानाच महाराष्ट्राच्या राजकारणात मोठं नाट्य पाहायला मिळालं. आज सकाळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली तर त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे विधीमंडळाचे माजी गटनेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आणि महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप आल्याचं पहायला मिळालं. 

दरम्यान या सर्व राजकीय नाट्यानंतर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेत माध्यमांना सर्व घडामोडींबद्दल माहिती दिली. ज्याला कॉंग्रेसने संपूर्ण पाठींबा दिला.   

अशातच आता कॉंग्रेच्या गोटातून कॉंग्रेसचे मोठे नेते अशोक चव्हाण यांनी  घडलेल्या सर्व प्रकारावर मौन सोडलंय.  

काय म्हणालेत अशोक चव्हाण : 

  • अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना फसवलं आणि देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांची दिशाभूल केली.
  • जे राष्ट्रवादीचे आमदार शपथ घेण्यासाठी गेले होते त्यातील 5 आमदार वगळता इतर सर्व परत राष्ट्रवादीच्या बैठकीला उपस्थित होते
  • काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिसवसेना सरकार स्थापनेसाठी सकारात्मक आहेत. 
  • आमदारांच्या सह्यांचा दुरुपयोग झाला
  • देवेंद्र फडणवीस यांनी 30 तारखेच्या विश्वासदर्शक ठरावाची वाट न पाहता राजीनामा द्यावा.
  • अजित पवार यांनी देखील त्यांच्या उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊन परत यावं 

दरम्यान, आता अजित पवार यांची राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या गटनेते पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. अजित पवार यांच्याऐवजी आता जयंत पाटील यांच्याकडे राष्ट्रवादीच्या विधिमंडळ गटनेतेपदाची  संविधानिक सूत्र गेली आहेत.  

WebTitle : This congress leader is saying ajit pawar should come back