पंतप्रधान मोदींचे अश्रू म्हणजे मगरीचे अश्रू - भाई जगताप

'लस पाठवली म्हणजे काही मेहरबानी केली का? आमचा हक्क आहे'
पंतप्रधान मोदींचे अश्रू म्हणजे मगरीचे अश्रू - भाई जगताप

मुंबई: "पंतप्रधान नरेंद्र मोदींचे (narendra modi) अश्रू हे मगरीचे अश्रू आहेत. महाराष्ट्राने सर्वात जास्त लसीकरण केले आहे. केंद्राने लस पाठवली म्हणजे काही मेहरबानी केली का? आमचा हक्क आहे आणि आम्ही लसीकरण केले" या शब्दात मुंबई काँग्रेस (Mumbai congress) अध्यक्ष भाई जगताप (bhai jagtap) यांनी मोदी सरकारवर टीका केली. "केंद्र सरकारने मार्चमध्ये सांगितलं की, कोरोना आता संपला आहे. मात्र या सगळ्यानंतर हाहाःकार कसा झाला?" असा सवाल त्यांनी विचारला. (Congress leaders bhai jagtap & nana patole hold protest against modi govt 7 years)

"लसी, रेमडेसिव्हीर, मास्क सगळ आपल्याकडे ठेवायचं, अरे हे कोणतं राजकारण आहे. आपण ९३ देशात लस का पाठवली? हा माझा प्रश्न आहे" असे भाई जगताप म्हणाले.

पंतप्रधान मोदींचे अश्रू म्हणजे मगरीचे अश्रू - भाई जगताप
मुंबईत जूनमध्ये दुकानं उघडू शकतात पण...

कोविडच्या महामारीमध्ये हे सरकार अपयशी ठरलं आहे, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. "पेट्रोलचे दर शंभरीच्या घरात पोहचले आहेत. अर्थकारण पडलं आहे. नोटाबंदी सगळ्यात महत्त्वाचे कारण आहे. बेरोजगारी वाढली आहे. हे शेतकरी विरोधी सरकार आहे. पंतप्रधानांमुळे देशाचा अपमान होत आहे. रेल्वे, BSNL अनेक गोष्टींचे खासगीकरण सुरु आहे" अशी टीका नाना पटोले यांनी केली.

पंतप्रधान मोदींचे अश्रू म्हणजे मगरीचे अश्रू - भाई जगताप
नेहरु ते राजीव गांधींच्या पुण्याईवर आज देश चाललाय - संजय राऊत

5 स्टार हॉटेलमध्ये १०००० रूपये देऊन लस देण्याचं काम सुरू आहे. म्हणजे काय श्रीमंत लोकांसाठी लस आहे? गरीब लोकांना लस कशी मिळेल? अशी चर्चा आहे. सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरलेल्या केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले आणि मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्या नेतृत्वाखाली आज मुंबई काँग्रेसकडून निषेध आंदोलन करण्यात आलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com