Vidhan Sabha 2019 : काँग्रेसची पहिल्या यादीत 21 नव्या चेहऱ्यांना संधी; 5 महिलांचा समावेश

सिद्धेश्वर डुकरे
शुक्रवार, 27 सप्टेंबर 2019

कॉंग्रेसची 72 जागांची पहिली यादी तयार 
 

मुंबई : काँग्रेस पक्षाने विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारांची यादी अंतिम केली आहे. यामधे 21 नवीन चेहऱ्यांना संधी दिली असून पाच महिलांना पहिल्या यादीत उमेदवारी जाहीर केली आहे. पहिल्या यादीतील एकूण 72 जागापैकी 28 जागांवर मराठा समाजाचे उमेदवार दिले आहेत.तर त्या खालोखल 18 जागावर ओबीसी उमेदवार दिले आहेत असे समजते. ही यादी "सकाळ'च्या हाती आली आहे.

मराठा-28
ओबीसी-18
मुस्लिम-7
एससी-6
एसटी-5
लिंगायत-3
राजपूत-3
इतर-2
महिला-5
पहिल्यांदा उमेदवारी-21

विद्यमान आमदारांमध्ये अक्कलकुआमधून के. सी. पाडवी, नंदूरबारमधून पद्माकर वळवी, रिसोडमधून अमित झनक, तिवसामधून यशोमती ठाकूर, सावनेरमधून सुनील केदार, ब्रह्मपुरीतून विजय वडेट्टीवार, भोकरमधून अशोक चव्हाण, पाथरीमधून सुरेश वरपूडकर, चेंबूरमधून चंद्रकांत हांडोरे, धारावीतून वर्षा गायकवाड, भायखळ्यातून मधू चव्हाण, भोरमधून संग्राम थोपटे, पुणे कँटोन्मेंटमधून रमेश बागवे, लातूर शहरमधून अमित देशमुख, सोलापूर शहरमध्यमधून प्रणिती शिंदे यांना उमेदवारी निश्‍चित करण्यात आली आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress list of first 72 candidates fixed For Vidhansabha Election 2019