esakal | बाळासाहेब थोरात राजीनामा देणार ? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या हालचालींना वेग
sakal

बोलून बातमी शोधा

बाळासाहेब थोरात राजीनामा देणार ? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या हालचालींना वेग

मंत्रिपद आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्षपद एकाच व्यक्तीकडे नको अशी अनेक दिवसांपासून मागणी होती.

बाळासाहेब थोरात राजीनामा देणार ? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या हालचालींना वेग

sakal_logo
By
राजू सोनावणे

मुंबई : मुंबई काँग्रेस प्रदेश अध्यक्ष बदलल्यानंतर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष बदलण्याच्या हालचालींना वेग आला आहे.  काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या जागी राजीव सातव, नाना पटोले किंवा अशोक चव्हाण यांच्या नावाची चर्चा जोर धरतेय. या सर्व नेत्यांच्या नावांमध्ये राजीव सातव यांचं नाव आघाडीवर आहे. मंत्रिपद आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्षपद एकाच व्यक्तीकडे नको अशी अनेक दिवसांपासून मागणी होती. दरम्यान, येत्या दोन दिवसांत याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.

congress Maharashtra party president balasaheb thorat may give resignation who will become next congress president

loading image