मुंबई : अजान सुरु होताच राहुल गांधींनी थांबविले भाषण

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 ऑक्टोबर 2019

अजान पूर्ण झाल्यावरच त्यांनी पुढच्या भाषणाला प्रारंभ केला. मल्लिकार्जुन खर्गे धारावीच्या आमदार वर्षा गायकवाड हे राहुल गांधी यांचे हे वागणे आदराने बघत होते. तसेच उपस्थित जनसमुदायही यावेळी शांत होता. 

मुंबई : धारावी हेच देशाच्या विकासाचे प्रतीक आहे. मोदीजींना मान्य नसले तरी आयडिया ऑफ इंडिया हीच आहे, असे राहुल गांधी सांगत असतानाच मशिदीतून अजान सुरू झाला अन् भाषण त्यांनी थांबवले.

अजान पूर्ण झाल्यावरच त्यांनी पुढच्या भाषणाला प्रारंभ केला. मल्लिकार्जुन खर्गे धारावीच्या आमदार वर्षा गायकवाड हे राहुल गांधी यांचे हे वागणे आदराने बघत होते. तसेच उपस्थित जनसमुदायही यावेळी शांत होता. 

राहुल गांधी हे आज (रविवार) महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात उतरले. राहुल गांधी यांनी औसा, साकीनाका आणि धारावी येथे प्रचारसभा घेतल्या. मोदींनी देशाचे वाटोळे केले असा थेट आरोप त्यांनी सरकारवर केला. तसेच देशात बेरोजगारी आणि शेतीचा प्रश्न भयंकर असल्याचे त्यांनी सांगितले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress MP Rahul Gandhi stop speech after start ajan in Dharawi Mumbai