मुंबईत सलग दुस-या दिवशी 5038 रूग्ण कोरोनामुक्त

मिलिंद तांबे
Sunday, 20 September 2020

आज 2,236 नवीन रुग्णांची भर , तर 44 रुग्णांचा मृत्यू...

मुंबई, ता. 20 : मुंबईत आज रुग्णांचा आकडा दोन हजारांच्यावर गेला असून आज 2,236 रुग्ण सापडले. त्यामुळे मुंबईतील एकूण रुग्णसंख्या 1,84,313 झाली आहे. रूग्णवाढीचा दर 1.24 टक्क्यांवरून कमी होऊन 1.22 वर खाली आला आहे. मुंबईत आज 44 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा 8,466 वर पोचला आहे. मुंबईत आज 5,038 रुग्ण बरे होऊन घरी गेले. रुग्ण बरे होण्याचा दर हा 80 टक्के इतका झाला आहे.

  • मुंबईत आज नोंद झालेल्या 44 मृत्यूंपैकी 33 जणांना दीर्घकालीन आजार होते.
  • आजच्या एकूण मृत्यू झालेल्या व्यक्तींमध्ये 33 पुरुष तर 11 महिलांचा समावेश होता.
  • एकूण मृत झालेल्या 44 रुग्णांपैकी एकाचे वय 40 च्या खाली होते.
  • 29 रुग्णांचे वय 60 वर्षा वर होते तर 14 रुग्ण 40 ते 60 वर्षा दरम्यान होते.

महत्त्वाची बातमी : आठवड्यात दुसऱ्यांदा शिवसेनेने दुसऱ्यांदा केलं मोदी सरकारच्या विधेयकांचे स्वागत

आज 5038 रुग्ण बरे झाले असून आज पर्यंत 1,47,807 रुग्णांना घरी सोडण्यात आले. मुंबईत रुग्णदुपटीचा दर हा 57 दिवसांवर गेला आहे. तर 19 सप्टेंबर पर्यंत एकूण 10,04,017  कोविड चाचण्या करण्यात आल्या. तर 13 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर दरम्यान कोविड रुग्णवाढीचा दर 1.22  इतका आहे. 

मुंबईत 609 इमारती आणि झोपडपट्टया कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. तर सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या 9,527 असून गेल्या 24 तासात बाधित रुग्णांच्या संपर्कात असलेले 17,610 अति जोखमीचे रुग्ण आहेत तर 2,316 रुग्ण कोविड केअर सेंटर 1 मध्ये उपचार घेत आहेत.

( संपादन - सुमित बागुल ) 

consecutively second time more than five thousand covid patients cured


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: consecutively second time more than five thousand covid patients cured