
कोरोनामुळे सीईटी परीक्षा निकालाच्या प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांना अखेर सीईटी सेलने दिलासा दिला. सीईटी सेलने आज दहा अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर केले.
मुंबई: कोरोनामुळे सीईटी परीक्षा निकालाच्या प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांना अखेर सीईटी सेलने दिलासा दिला. सीईटी सेलने आज दहा अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर केले. यामध्ये तंत्रशिक्षण विभागातील एमआर्च, एमसीए, एमएचएमसीटी, बीएचएमसीटी या अभ्यासक्रमांचे; तर उच्च शिक्षण विभागातील बीएड-एमएड (एकात्मिक) आणि विधी पाच वर्षे या अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर करण्यात आले. एमएचटी-सीईटी परीक्षेचा निकाल 29 नोव्हेंबरला जाहीर होईल, असे सूत्रांनी सांगितले.
हेही वाचा - शिवाजी नाट्यमंदिराच्या भाड्यात सवलत मिळावी; मराठी नाट्य व्यावसायिक निर्माता संघाची मागणी
सीईटी सेलअंतर्गत येणाऱ्या विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा ऑक्टोबरमध्ये घेण्यात आल्या होत्या; मात्र नोव्हेंबरअखेरीसही निकाल न लागल्याने विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. राज्यभरातून तब्बल सहा लाख 48 हजार 218 विद्यार्थ्यांनी सीईटीकडून घेतलेल्या विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांची परीक्षा दिली आहे.
तंत्रशिक्षण विभागांतर्गत येणाऱ्या एमआर्च अभ्यासक्रमाची परीक्षा 967 विद्यार्थ्यांनी दिली होती; तर एमसीएची परीक्षा 15,376 विद्यार्थी, एमएचएमसीटीची परीक्षा 1108 विद्यार्थी, बीएचएमसीटीची परीक्षा अवघ्या 23 विद्यार्थ्यांनी दिली होती. उच्चशिक्षण विभागातील बीएड-एमएड (एकात्मिक) या अभ्यासक्रमाची परीक्षा 983 विद्यार्थ्यांनी, विधी पाच वर्षे अभ्यासक्रमाची परीक्षा 16 हजार 349 विद्यार्थ्यांनी दिली होती. या पाच अभ्यासक्रमांचा निकाल जाहीर झाल्याने तब्बल 34 हजार 806 विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला. परीक्षेचा निकाल https://www.mahacet.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
हेही वाचा - शिवाजी नाट्यमंदिराच्या भाड्यात सवलत मिळावी; मराठी नाट्य व्यावसायिक निर्माता संघाची मागणी
सीईटीचा निकाल 29 नोव्हेंबरला ?
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष पदवी प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमएचटी-सीईटी परीक्षेचा निकाल 29 नोव्हेंबरला जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सीईटी सेलने पीसीबी आणि पीसीएम ग्रुपची परीक्षा ऑक्टोबरमध्ये घेतली होती. या परीक्षेला विद्यार्थ्यांचा कमी प्रतिसाद मिळाला. त्यामुळे परीक्षा देता न आलेल्या विद्यार्थ्यांसाठी पुन्हा परीक्षा आयोजित केली. परीक्षेचा निकाल 29 नोव्हेंबरला जाहीर केला जाईल. यामुळे सीईटी परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा लवकरच संपुष्टात येणार आहे.
हेही वाचा - घटनेला पायदळी तुडवूनच मोदी सरकारचा कारभार; खासदार हुसेन दलवाई यांची टीका
-
अभ्यासक्रम- परीक्षा दिलेली तारीख- विद्यार्थी संख्या
एमसीए- 28 ऑक्टोबर- 110631
एमआर्च- 27 ऑक्टोबर- 967
बीएचएमसीटी- 10 ऑक्टोबर- 1108
एमएचएमसीटी- 27 ऑक्टोबर- 23
विधी पाच वर्ष- 11 ऑक्टोबर- 16349
बीएस्सी/बीए बीएड- 18 ऑक्टोबर- 1212
बीएड एमएड- 27 ऑक्टोबर- 983
एमपीएड- 29 ऑक्टोबर- 1581
बीपीएड- 4 नोव्हेंबर- 5811
एमएड- 5 नोव्हेंबर- 2157
निकाल जाहीर झालेले एकूण विद्यार्थी- 140922
Consolation to the students awaiting the results of the ten CET courses
-----------------------------------------------------------
( संपादन - तुषार सोनवणे )