मुंबई विद्यापीठात संविधान दिन उत्साहात साजरा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 नोव्हेंबर 2019

संविधान दिनानिमित्त आज मुंबई विद्यापीठात विविध कार्यक्रम झाले.

मुंबई : संविधान दिनानिमित्त आज मुंबई विद्यापीठात विविध कार्यक्रम झाले. फोर्ट संकुलात सकाळी ९ वाजता संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. ‘इंडियन कॉन्स्टिट्यूशनल लॉ अँड न्यू चॅलेंजेस’ या विषयावर दुपारी चर्चासत्र घेण्यात आले.

या चर्चासत्राला मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती एस. यू. कामदार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी केलेल्या तीन उत्कृष्ट सादरीकरणांना पारितोषिके देण्यात आली. कलिना संकुलात डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन ते जवाहरलाल नेहरू ग्रंथालयापर्यंत संविधान दिंडी काढण्यात आली.

शारिरीक शिक्षण विभागाच्या वतीने लेझीम प्रात्यक्षिके करण्यात आली. मुंबई विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी भारतीय घटनेच्या सरनाम्याचे वाचन केले. संविधान दिंडीत प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
 

web title : Constitution Day celebrated with enthusiasm at Mumbai University


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Constitution Day celebrated with enthusiasm at Mumbai University