मुंब्रा बायपासवरून कंटेनर खाली कोसळला; सुदैवाने चालक बचावला 

राहुल क्षीरसागर
Sunday, 29 November 2020

मुंब्रा बायपास रस्त्यावरून एक कंटेनर खाली कोसळल्याची घटना शनिवारी (ता. 28) घडली. सुदैवाने या अपघातात कोणीही मृत अथवा गंभीर जखमी झालेले नाही.

ठाणे : मुंब्रा बायपास रस्त्यावरून एक कंटेनर खाली कोसळल्याची घटना शनिवारी (ता. 28) घडली. सुदैवाने या अपघातात कोणीही मृत अथवा गंभीर जखमी झालेले नाही. अपघातग्रस्त ट्रकमध्ये अडकलेल्या व जखमी अवस्थेत असलेल्या वाहनचालकाला सुखरूप बाहेर काढण्यात आपत्ती व्यवस्थापन पथक आणि अग्निशमन दलाच्या पथकास यश आले आहे. या अपघाताची मुंब्रा पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. 

बटनामध्ये कोकेन लपवून तस्करी! आंतरराष्ट्रीय टोळीतील तिघांना अटक

शनिवारी दुपारी मुंब्य्रातून तळोजाकडे जात असताना एमएच 46, आरएफ 1250 हा कंटेनर मुंब्रा येथील बायपास रस्त्यावरून खाली कोसळला. या घटनेची माहिती मिळताच ठाणे पालिका आपत्ती व्यवस्थापन पथक व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य राबवले. या अपघातात चालक किरकोळ जखमी झाला. त्यास त्वरित कळवा येथील छत्रपती शिवाजी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी मुंब्रा पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. या बायपासला लागून खाली अनेक घरे आहेत; मात्र या अपघातामुळे या घरांचे कोणतेही नुकसान झाले नसून, कोणीही मृत अथवा जखमी झाले नसल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या वतीने देण्यात आली आहे. 
The container collapsed from the Mumbra bypass Luckily the driver survived

----------------------------------------------------

संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The container collapsed from the Mumbra bypass Luckily the driver survived