परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रातील गौप्यस्फोट करणारे संवाद, वाचा...

परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रातील गौप्यस्फोट करणारे संवाद, वाचा...

मुंबई : नुकतीच परमबीर सिंह यांची मुंबई पोलिस आयुक्तपदावरून उचलबांगडी करण्यात आली. सचिन वाझे प्रकरणात आयुक्त परमबीर सिंह यांच्या कार्यालयाकडून काही अक्षम्य चुका झाल्यात, म्हणूनच परमबीर सिंह यांची बदली झाल्याचं स्वतः अनिल देशमुख यांनी एका मुलाखतीत म्हंटले. यानंतर परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिलं आहे. यामध्ये परमबीर सिंह यांनी थेट अनिल देशमुख यांच्यावर वसुलीचे आरोप लावलेत. अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना दरमहा १०० कोटी रुपये वसुली करायला सांगितल्याचे आरोप परमबीर सिंह यांनी आपल्या पत्रात म्हंटले.   

ज्या दोन अधिकाऱ्यांची नावे परमबीर सिंह यांनी पत्रात लिहिली आहेत, त्या दोन अधिकाऱ्यांचे आणि परमबीर सिंह यांचे नेमके काय संभाषण झाले ते आता समोर आलं आहे.

स्वतः परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात या संवादाची कॉपी जोडली आहे. 

१६ मार्च रोजी झालेलं संभाषण : 

  • परमबीर सिंह : पाटील तू गृहमंत्री आणि पालांडे यांना फेब्रुवारीत भेटला तेंव्हा किती बार,  रेस्टॉरंट्स आणि इतर ठिकाणे त्यांनी सांगितली होती 
  • परमबीर सिंह : आणि एकूण किती पैसे जमा करायला सांगितले होते. 
  • परमबीर सिंह : जरा पटकन...
  • ACP पाटील : मुंबईतील १ हजार ७५० बार्स, रेस्टॉरंट्स आणि इतर काही बाबी. प्रत्येकी ३ लाख रुपये
  • ACP पाटील :  महिन्याकाठी एकूण ५० कोटी जमा झाले पाहिजेत
  • परमबीर सिंह : आणि वाझे भेटलेले ती तारीख काय होती 
  • ACP पाटील :  सर मला तारीख नक्की आठवत नाही 
  • परमबीर सिंह : तुम्ही म्हणालात तुमच्या भेटीआधी काही दिवस 
  • ACP पाटील : हो सर फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी 

१९ मार्च रोजी झालेलं संभाषण : 

  • परमबीर सिंह : पाटील मला आणखी काही माहिती हवी आहे 
  • परमबीर सिंह : गृहमंत्र्यांना भेटल्यानंतर तुला वाझे भेटले होते का ? 
  • ACP पाटील :  हो सर गृहमंत्र्यांना भेटल्यानंतर वाझे मला भेटले होते
  • परमबीर सिंह : गृहमंत्र्यांनी का बोलावलं, ते तुला सांगितलं का ? 
  • ACP पाटील :  त्यांनी मला सांगितलं भेटीचे कारण, १ हजार ७५० ठिकाणांहून ३ लाख रुपयांप्रमाणे महिन्याकाठी ४० ते ५० कोटी जमा करायला सांगितले होते. 
  • परमबीर सिंह : अरे ! हे तुला जे सांगितलं तेच त्याला देखील सांगितलं 
  • ACP पाटील :  चार मार्चला त्यांचा सहाय्य्क पलांडे यांनीही मला हेच सांगितलं
  • परमबीर सिंह : म्हणजे पलांडे यांना तू ४ मार्चला भेटलास 
  • ACP पाटील :  हो सर मला बोलावलं होतं 

conversation between param bir singh an ACP patil about anil deshmukhs demand to collect money

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com