मुंबईत दिवसभरात कोरोनाच्या १९५ नव्या रुग्णांची भर; एकाचा मृत्यू | Mumbai corona update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

corona update

मुंबईत दिवसभरात कोरोनाच्या १९५ नव्या रुग्णांची भर; एकाचा मृत्यू

sakal_logo
By
मिलिंद तांबे

मुंबई : मुंबईतील नवीन रुग्णांसह सक्रिय रुग्णांची संख्या (corona active patients) दोन हजाराने कमी झाली असून 2808 वरून 2649 पर्यंत खाली आली आहे. मुंबईतील रूग्ण (Mumbai corona patients) दुपटीचा कालावधी वाढून 2308 दिवस झाला आहे. मुंबईतील रुग्णसंख्या नियंत्रणात असल्याने पॉझिटिव्हिटी दर (corona positivity rate) देखील 0.03 पर्यंत खाली आला आहे.

हेही वाचा: केंद्र सरकार स्वच्छ सर्वेक्षण 2021; मोठ्या शहरांमध्ये मुंबई अव्वल

आज कोरोनाचे 195 नवे रुग्ण आढळले. कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 7,60,933 वर पोहोचली आहे. आज 351 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने आतापर्यंत 7,39,426 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.मुंबईत मृत्यूंची संख्या नियंत्रणात असून आज 1 कोविड मृत्यूची नोंद झाल्याने मृतांचा एकूण आकडा 16,303 वर पोहोचला आहे.

बरे झालेल्या रूग्णांचा दर 97 टक्के असून कोविड वाढीचा दर 0.03 टक्के झाला आहे. मुंबईत कोविड चाचण्या वाढवण्यात आल्या आहेत. आज दिवसभरात 37,661 कोविड चाचण्या केल्या गेल्या असून आतापर्यंत 1,21,08,846 एवढ्या चाचण्या झाल्या आहेत.

loading image
go to top