लोकंहो सावधान! कोरोनामुळे रुग्णांच्या मृत्यूचा आकडा पुन्हा वाढला

मिलिंद तांबे
Thursday, 3 December 2020

गेल्या काही दिवसांपासून नियंत्रणात असलेले राज्यातील कोरोना मृत्यू आज पुन्हा एकदा वाढल्याचे दिसले. आज राज्यात 111 रूग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून मृत्यूदर 2.58 इतका झाला आहे.  

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून नियंत्रणात असलेले राज्यातील कोरोना मृत्यू आज पुन्हा एकदा वाढल्याचे दिसले. आज राज्यात 111 रूग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून मृत्यूदर 2.58 इतका झाला आहे.  
आज राज्यात 5,600 रूग्णांचे निदान झाले असून राज्यातील एकूण रूग्णांची संख्या 18,32,176 इतकी झाली आहे. राज्यात आज रोजी एकूण 88,537 ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.  

हेही वाचा - मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरण! आजपासून विशेष न्यायालयाकडून नियमित सुनावणी 

राज्यात आज दिवसभरात 5,027 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 16,95,208 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. रूग्ण बरे होण्याचा दर 92.52 टक्के इतका आहे. गेल्या महिन्याभरात राज्यात नविन निदान झालेल्या रुग्णांसह बरे झालेल्या रुग्णांची संख्या ही वाढली असून ऍक्टीव्ह रूग्णांची संख्या कमी झाली आहे.   
आज राज्यात दिवसभरात 111 मृत्यूची नोंद झाली असून मृतांचा आकडा 47,357 वर पोहोचला आहे. आज झालेल्या मृत्यूंमध्ये ठाणे परिमंडळ 37, पुणे 20,नाशिक 17, कोल्हापूर 5,औरंगाबाद 5, लातूर मंडळ 7,अकोला मंडळ 1 ,नागपूर 18 व इतर राज्य 1 येथील मृत्यूंचा समावेश आहे. आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी 50 मृत्यू हे मागील 48 तासातील तर 25 मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित 36 मृत्यू हे एक आठवड्यापूर्वीचे आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.58 % एवढा आहे.

हेही वाचा - KEMमध्ये बीसीजी लसीचा टप्पा पूर्ण, 109 ज्येष्ठ नागरिकांना यशस्वी डोस

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 1,09,89,496 नमुन्यांपैकी 18,32,176 ( 16.67 टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 5,47,791 लोकं होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 6,073 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Corona again increased the number of patient deaths

-------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona again increased the number of patient deaths