मिशन धारावी : धारावीत घरोघरी स्क्रिनिंगला सुरुवात, साडे ७ लाख घरांत जाणार आरोग्य कर्मचारी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 एप्रिल 2020

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर धारावीतील प्रत्येकाची प्राथमिक चाचणी करायला मुंबई महानगरपालिका प्रशासनाने सुरुवात केली आहे. पहिल्याच दिवशी धारावीतील मुकुंद नगर आणि आजूबाजूच्या परिसरात स्क्रिनिंगला सुरुवात करण्यात आली.

धारावी, मुंबई : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर धारावीतील प्रत्येकाची प्राथमिक चाचणी करायला मुंबई महानगरपालिका प्रशासनाने सुरुवात केली आहे. पहिल्याच दिवशी धारावीतील मुकुंद नगर आणि आजूबाजूच्या परिसरात स्क्रिनिंगला सुरुवात करण्यात आली.

खासदार राहुल शेवाळे यांच्या पुढाकारातून स्क्रिनिंग दरम्यान खासगी डॉक्टर्स आणि पालिका कर्मचाऱ्यांचा समावेश असलेले पथक धारावीतील प्रत्येक घरात जाऊन, डिजिटल थर्मामीटरच्या साहाय्याने प्रत्येकाच्या शरीराच्या तापमानाची नोंद करत आहेत. तसेच त्यांचा नुकताच केलेला प्रवास (ट्रॅव्हल हिस्टरी) आणि इतर प्रश्न विचारून नागरिकांकडून माहिती गोळा केली जात आहे. 

मोठी बातमी - आजच्या मीटिंगमध्ये मुंख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींकडे केलीये 'ही' मागणी

खासदार शेवाळे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत इंडियन मेडिकल काउन्सिल आणि महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमार्फत सुमारे 150 खासगी डॉक्टर्स पालिका कर्मचाऱ्यांच्या मदतीने येत्या 10-12 दिवसांत संपूर्ण धारावीचे स्क्रिनिंग करणार आहेत.

अमृता फडणवीसांची धारावीकरांना मदत : 

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणविस यांनी त्यांच्या दिव्याज फाउंडेशनच्या वतीने धारावीमधील रहीवाशी आणि नागरीकांना सध्याच्या आपत्कालीन परीस्थितीत अन्नधान्य पुरवठा केलाय. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोविड १९ पासून नागरीकांचा बचाव व्हावा यासाठी मास्क, हाँडग्लोज आणि इतर सुरक्षा साधनं तसंच किटकनाशक यांचे 5000 किट्स देखील  देण्यात आले आहेत आले आहेत. सदर किट्स धारावीचे प्रतानिधी मणि बालन यांनी स्वीकारलेत आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी या साधन सामुग्रीचं धारावीमध्ये वाटप केलंय.

corona crisis screening of each and everyone stats in dharavi mumbai


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona crisis screening of each and everyone stats in dharavi mumbai