ठाणेकरांनो घरातच रहा! कोरोनाचा धोका वाढतोय! वाचा अपडेट

ठाणेकरांनो घरातच रहा! कोरोनाचा धोका वाढतोय! वाचा अपडेट

ठाणे, : ठाणे जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून एका दिवसात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत तब्बल 46 ने वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यावरील कोरोनाचे संकट अधिकच गडद झाले आहे. मागील 24 तासात ठाणे महापालिका क्षेत्रात सर्वाधिक 23 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर, नवी मुंबई आणि मीरा भाईंदर पालिकाक्षेत्रात प्रत्येकी 11 नवीन रुग्ण आढळून आले असून कल्याणमध्ये एक असे एकूण 46 नवीन रुग्ण आढळून आल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 232 वर पोहोचली आहे.

ठाणे जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभागाकडून मोठ्या प्रमाणात उपाययोजना करण्यात येत आहे. अनेक खासगी रुग्णालये ताब्यात घेवून कोरोना रुग्णांसाठी आरक्षित करण्यात आली आहेत. नागरिकांना बाहेर न पडण्याचे आवाहन देखील जिल्हा प्रशासनाकडून वारंवार करण्यात येत आहे. तरी देखील नागरिक भाजी मार्केट, घाऊक बाजार पेठांमध्ये गर्दी करत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्यात सोमवारी एका दिवसात तब्बल 46 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची आकडेवारी हि 232 वर पोहोचली असून आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाला आहे.

 मोठ्या शहरात धोका अधिक
 ठाणे जिल्ह्यात वाढलेल्या रुग्णांमध्ये सर्वाधिक ठाणे पालिका क्षेत्रात 23 नवीन रुग्ण आढळून आल्याने तेथील संख्या 68 झाली आहे. त्या पाठोपाठ कल्याणमध्ये एक रुग्ण आधल्याने तेथील संख्या 56 झाली आहे. तर, नवी मुंबई महापालिका क्षेत्रात 11 नव्या रुग्णांची नोंद झाल्यामुळे तेथील रुग्णाचा आकडा 50 वर पोहोचला, मीरा भाईंदर मध्ये देखील सोमवारी 11 रुग्णांची नोंद झाल्यामुळे तेथील संख्या 47 वर पोहोचली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com