मुंबईच्या 'या' गणेशोत्सव मंडळांकडून भक्तांसाठी बाप्पाचे दर्शन ऑनलाईन

 Online darshan of Ganpati Bappa
Online darshan of Ganpati Bappa sakal media

मुंबई : कोरोना (corona) आणि लाॅकडाऊनमुळे (lockdown) राज्य सरकारने (mva government) सार्वजनिक उत्सवांवरील लावलेल्या निर्बंधांमुळे (corona restrictions) यंदाही गणेशभक्तांच्या उत्साहात विघ्न आले असले तरी लाडक्या बापाचे दर्शन सार्वजनिक गणेश मंडळांनी (Ganpati festival) ऑनलाईनवर उपलब्ध केले आहे. त्यामुळे यंदाही गणपती बाप्पाचा आर्शिवाद ऑनलाईनवर (online darshan) भक्तांना मिळू शकेल.

 Online darshan of Ganpati Bappa
कोरोनामुळे हरवलेला ‘सूर’ शोधतो आहे!

मुंबईतील आकर्षक गणपती असलेल्या किंगसर्कल येथील जीएसबी सेवा मंडळाचे यंदाचे 67 वे वर्ष आहे. मंडळाची अत्यंत देखणी मूर्ती असून ऑनलाईनवर कोट्यवधी भाविक गणेशोत्सवामध्ये पूजा आणि हवन विधीमध्ये सहभागी होत असतात, असे मंडळाचे विश्वस्त राघवेंद्र भट यांनी सांगितले. मंडळात प्रामुख्याने गणपतीशी निगडित विधी होत असतात, यामध्ये सहस्त्र नाम, दुर्वार्पण, गणहोम, दिपांलकार असे विविध पूजा विधी असतात. भाविक यामध्ये सहभागी होत असतात आणि याची नोंदणी देखील सुरू झाली आहे, असे भट म्हणाले.

मागील वर्षी देशातील आणि परदेशातील कोट्यवधी गणेश भक्त यामध्ये सहभागी झाले होते. मंडळाच्या संकेतस्थळावर आणि जिओ टीव्हीवर सकाळी सात ते रात्री दहापर्यंत भाविक ऑनलाईनवर यामध्ये सहभागी होत असतात, असेही त्यांनी सांगितले. राज्य सरकारने गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांवर निर्बंध लागू केले आहेत. सरकारने निर्धारित केलेल्या मार्गदर्शक तत्वांना आम्ही सहकार्य करणार आहोत, सरकारनेदेखील मंडळाच्या मागण्यांवर विचार करायला हवा, अशी प्रतिक्रिया ब्रुहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष एड नरेंद्र दहीबावकर यांनी दिली. मंडळाकडे सुमारे बारा हजार गणेश मंडळांंची नोंद आहे.

यापैकी सुमारे तीन हजार मंडळे मंडप उभारुन गणेशोत्सव साजरा करतात. या मंडळांनी त्यांच्या गणेशाचे दर्शन ऑनलाइन उपलब्ध केलेले आहे. कारण मंडपात जर गर्दी नको असेल तर हाच पर्याय आहे, असे दहीबावकर म्हणाले. यंदाच्या वर्षी किमान भाविकांना गणपतीचे मुखदर्शन करण्याची मुभा मिळावी, अशी मागणी समितीच्या वतीने करण्यात आली आहे, असेही ते म्हणाले.

 Online darshan of Ganpati Bappa
धारावी: सिलेंडर स्फोटात 14 जण जखमी; दोन अत्यवस्थ

वडाळामधील जीएसबी सार्वजनिक गणेशोत्सव समितीचा लोकप्रिय गणपतीदेखील भक्तांना औनलाईनवर दर्शन देतो. कोरोनामुळे अनेक निर्बंध आले आहेत. त्यामुळे उत्सवावरही मर्यादा आल्या आहेत. पण तरीही गणपती उत्सव साजरा केला जातो. लवकरच हे संकट दूर होईल, अशी आशा समितीचे विशेष सल्लागार उल्हास कामत यांनी व्यक्त केली.

मुंबईतला जुना आणि 94 वर्षांंची परंपरा असलेला चिंचपोकळीमधील गणेशगल्लीचा गणपतीदेखील मागील तीन चार वर्षांपासून ऑनलाईनवर उपलब्ध आहे. गणेशगल्लीचा गणपती अर्थात मुंबईच्या राजाची वेबसाईट, यूट्यूब चैनल आहे आणि गणेशोत्सवामध्ये राजाचे ऑनलाइन दर्शन भक्तांना उपलब्ध असते, असे मंडळाचे सरचिटणीस स्वप्नील परब यांनी सांगितले. कोरोनापूर्वी मुंबईच्या राजाची मूर्ती बावीस फूट असायची, मात्र आता शाडू मातीची चार फूट उंचीची गणेश मूर्ती असते. तसेच मंडळाच्या सामाजिक कामांची परंपरा यंदाही कायम असून स्टेमसेल डोनरचा उपक्रम ता. 12 रोजी राबविण्यात येणार आहे, असे परब यांनी सांगितले.

अंधेरी पश्चिम येथील आझाद नगर सार्वजनिक उत्सव समितीचा अंधेरीचा राजा गणपती मागील दोन तीन वर्षे त्यांच्या संकेतस्थळामार्फत ऑनलाईन झाला आहे. गणेशोत्सवमध्ये गणपतीची आरती आणि दर्शन ऑनलाईनवर भाविकांना पाहता येते. कोरोनामुळे सामाजिक उपक्रमांवर बंधने असली तरी मंडळाने कोरोना काळात अन्न धान्य वाटपाचे काम केले आहे, असे समितीचे प्रवक्ते उदय सैलियन यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com