esakal | रायगड जिल्ह्यात कोरोनाचा वेग वाढला! एकूण रुग्णसंख्येत राज्यात चौथ्या स्थानावर
sakal

बोलून बातमी शोधा

रायगड जिल्ह्यात कोरोनाचा वेग वाढला! एकूण रुग्णसंख्येत राज्यात चौथ्या स्थानावर
  • कोरोना वाढीत रायगड चौथ्या क्रमांकावर
  • लॉकडाऊनमध्ये साडेतीन हजार रुग्णांची भर; रुग्ण बरे होण्याच्या संख्येतही वाढ

रायगड जिल्ह्यात कोरोनाचा वेग वाढला! एकूण रुग्णसंख्येत राज्यात चौथ्या स्थानावर

sakal_logo
By
महेंद्र दुसार - सकाळ वृत्तसेवा


अलिबाग : रायगड जिल्ह्यातील दहा दिवसांच्या लॉकडाऊनमध्ये 4  हजार 747 रुग्णांची भर पडत एकूण रुग्णसंख्या 13 हजार 605 इतकी झाली आहे. रुग्णसंख्या वाढीत रायगड जिल्ह्याने पालघरला मागे ठाकले आहे. यामुळे रुग्णसंख्येत रायगड जिल्हा चौथ्या क्रमांकावर आला आहे.

दरम्यान, शनिवारी लॉकडाऊन शिथील करताच नागरिकांची वर्दळ दिसून येत होती. सायंकाळी उशिरापर्यंत दुकाने चालू ठेवून दुकानदारांनी आपले व्यवहार सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. कोरोना रुग्णसंख्येमध्ये मुंबई, ठाणे, पुणे नंतर रायगड जिल्ह्याचा क्रमांक लागत आहे.

पतपेढ्यांचे अर्थकारण डळमळीत! कर्जवसूली 5 ते 10 टक्क्यांवर; नवे कर्जदार मिळणेही कठिण

मोठया प्रमाणावर वाढत असल्याने त्याला थोपविण्यासाठी पालकमंत्री अदिती तटकरे यांनी पुढाकार घेत जिल्ह्यात लागू केलेल्या लॉकडाऊनच्या कालावधीतील 104 जणांचा मृत्यू झाला असल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे.   शनिवारी आढळलेल्या 452 नवीन रुग्णांमुळे एकूण रुग्णांची संख्या 13 हजार 605 झाली आहे. आज 16 जणांच्या मृत्यूने बळींची एकूण संख्याही 350 वर पोचहली आहे.   तर कोरोनामधून मुक्त झालेल्यांची संख्या देखील 8 हजार 874 झाली आहे. तर 3 हजार 697 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.    कोरोनाचा वेगाने होणारा प्रसार रोखण्यासाठी आणि कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सदर लॉकडाऊन बुधवार  15 जुलै पासून सुरु करण्यात आला होता.  त्यानंतर जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी अध्यादेश काढताना शनिवार, रविवार लक्षात घेऊन या लॉकडाऊनची मुदत 26 जुलैपर्यंत दोन दिवसाने वाढवली होती. 

अवैध मटणविक्रीवर आता कारवाईचा बडगा; सोमवारपासून पालिकेची मोहीम....

शनिवारी आढळलेल्या नवीन रुग्णांमध्ये पनवेल मनपा क्षेत्रात 157, पनवेल ग्रामीण 39, उरण 26, खालापूर 16, कर्जत 18, पेण 46, अलिबाग 24, मुरुड 1, रोहा 29,  श्रीवर्धन 4, म्हसळा 44, महाड 42 आणि पोलादपूर 3 अशा 452 जणांचा समावेश आहे.

loading image