नवी मुंबईच्या महापे एमआयडीसीतून आली धक्कादायक बातमी; पालिका प्रशासनाची उडाली झोप

सकाळ वृत्तसेवा 
Wednesday, 22 April 2020

  • महापेत 19 कामगारांना कोरोनाची लागण
  • बाधित एकाच कंपनीमधील; महापालिका यंत्रणेची धावपळ

नवी मुंबई: महापे एमआयडीसीमध्ये एकाच कंपनीतील 19 कामगारांना कोरोनाची लागण झाली आहे. अचानक एवढ्या मोठ्या प्रमाणात कोरोनाबधित रुग्ण सापडण्याची नवी मुंबईतील ही पहिलीच घटना आहे. त्यामुळे महापालिका आणि पोलिस यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या आहेत. 

मुंबईतील महत्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

महापे एमआयडीसीतील मिलेनियम पार्कमध्ये एक आयटी कंपनी आहे. या कंपनी व्यवस्थापनाने स्वतःहून काही दिवसांपूर्वी कंपनीतील कर्मचाऱ्यांचे खासगी लॅबमध्ये स्वाब टेस्ट घेतल्या होत्या. त्या चाचणीचे आज अहवाल प्राप्त झाल्यानंतर तब्बल 19 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. या सर्व कामगारांना महापालिकेच्या वाशीतील कोव्हिड-19 रुग्णालयात भरती केले आहे. यातील काही कामगार नवी मुंबईतील, तर काही नवी मुंबईबाहेरील रहिवासी आहेत. महापालिकेतर्फे कामगार, सुरक्षा रक्षक, व्यवस्थापक आदी कर्मचाऱ्यांची माहिती घेतली जात आहे. तसेच कोरोनाबधित कामगारांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचा शोध घेण्यासाठी नवी मुंबई पोलिसांची मदत घेतली जात आहे

अधिक आणि सविस्तर बातम्या वाचण्यासाठी ईपेपर वाचा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona infections in mahape midc 19 workers