esakal | मुंबई आयुक्तांच्या बंगल्यात कोरोनाचा शिरकाव; तर आवारात 'इतक्या' रुग्णांची नोंद
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबई आयुक्तांच्या बंगल्यात कोरोनाचा शिरकाव; तर आवारात 'इतक्या' रुग्णांची नोंद

सरकारी कर्मचार्यांच्या वसाहती कोव्हिड संसर्गापासून वाचलेल्या नसतानाच महापालिका आयुक्तांच्या बंगल्याच्या आवारतही  कोव्हिडचे रुग्ण आढळले आहेत. या बंगल्याच्या आवारात काही कर्मचार्यांचीही निवासस्थाने आहेत.

मुंबई आयुक्तांच्या बंगल्यात कोरोनाचा शिरकाव; तर आवारात 'इतक्या' रुग्णांची नोंद

sakal_logo
By
समीर सुर्वे : सकाळ वृत्तसेवा

मुंबई : सरकारी कर्मचार्यांच्या वसाहती कोव्हिड संसर्गापासून वाचलेल्या नसतानाच महापालिका आयुक्तांच्या बंगल्याच्या आवारतही  कोव्हिडचे रुग्ण आढळले आहेत. या बंगल्याच्या आवारात काही कर्मचार्यांचीही निवासस्थाने आहेत.

गणेशोत्सवाच्या तोंडावर एसटी सेवा सुरु होणार? कर्मचाऱ्यांना कामावर हजर होण्याचे आदेश...

महालक्ष्मी जवळील कारमायकल मार्गावर महापालिका आयुक्त आणि मुंबई पोर्ट ट्रस्टच्या अध्यक्षांचा बंगला आहे. या दोन्ही निवासस्थानाच्या परिसरात कोविडचे 15 रुग्ण आढळले असल्याची नोंद महापालिकेकडे उपलब्ध आहे. या दोन्ही बंगल्यांच्या आवारात कर्मचार्यांच्याही वसाहती असून नियमानुसार संबंधित व्यक्तींची नावे जाहीर करण्यात आलेली नाही. महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल अद्याप या निवासस्थानात राहायला आलेले नाहीत. महापालिकेने शहरातील इमारतींमध्ये आढळलेल्या रुग्णांची माहिती जाहीर केली आहे.त्यात आयुक्त आणि पोर्ट ट्रस्ट अध्यक्षांच्या बंगल्याच्या आवारात 15 रुग्ण असल्याची नोंद आहे.

नवख्या डॉक्टरांना गलेलठ्ठ पगार! रुग्णालयात वर्षानुवर्षे काम करणाऱ्या डॉ़क्टरांकडे मात्र दुर्लक्ष

राज्याच्या राज्यपालांचे निवासस्थान असलेल्या राजभवनमधील कर्मचार्यांना कोविडची बाधा झाली आहे.तर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या कुटूंबियांसाठी आणि निवासस्थानाच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिस कर्मचार्यांनाही कोविडची बाधा झाली आहे.तर राज्याच्या काही वरीष्ट सनदी अधिकार्यांना कोविडची बाधा झाली आहे. मुंबईतील विविध पोलिस वसाहतीत 861 आणिि पालिकेच्या विविध वसाहतीत 251 रुग्ण सध्या आहेत.नायगाव पोलिस वसाहतीत 218 आणि वरळी पोलिस कॅम्प मध्ये 190 रुग्ण सध्या आहेत.तर वांद्रे येथील शासकिय वसाहतीतही 78 रुग्ण आहेत. शासकीय कर्मचार्यांनाा कोविडची बाधा झाल्यानंतर त्यांच्या पासून त्यांच्या कुटूंबियांनाही संसर्ग होत असल्याचे प्रकार घडत आहेत.

--------------------------------------------

संपादन - तुषार सोनवणे