
मुंबई : कोरोना (corona) आणि लॉकडाऊनचा (lockdown) सामना नागरिकांना करावा लागत असला तरी यामुळे महिलांच्या विरोधातील (cases against women's) गुन्ह्यात घट झालेली नाही. उलट मागील वर्षीच्या तुलनेत यंदा जानेवारी ते जून या कालावधीत मुंबईमध्ये (Mumbai) 2611 गुन्ह्यांची नोंद झाली आहे. मागील दोन वर्षे मुंबईकर विविध निर्बंधांमुळे अडचणीत आलेले आहेत. रेल्वेचा प्रवास सर्वसामान्य नागरिकांना बंद झाल्यामुळे अनेकांना आर्थिक टंचाईचा (financial crisis) सामना करावा लागत आहे. यातच आता मुंबई पोलिसांच्या आकडेवारीनुसार (Mumbai police reports) मागील वर्षीच्या तुलनेत यंदा महिला संबंधित गुन्ह्यात वाढ झाली आहे.
मागील वर्षी जानेवारी ते जून या कालावधीत सुमारे 1995 गुन्ह्यांची नोंद करण्यात आली होती. चालू वर्षी जानेवारी ते जून यामध्ये 2611 गुन्ह्यांची नोंद झाली आहे. त्यामुळे यंदा 616 गुन्हे वाढले आहेत. यापैकी 475 फौजदारी फिर्यादी या बलात्काराच्या गुन्ह्यांशी संबंधित आहेत. यामध्ये 361 प्रकरणांचा तपास लावण्यात पोलिसांना यश आलेले आहे.
तसेच यामध्ये अल्पवयीन मुलांसंबंधित गुन्हे 282 असून 253 मध्ये पोलिसांनी आरोपीचा छडा लावला आहे. सर्वाधिक गुन्हे विनयभंगाचे असून 939 प्रकरणे नोंदविण्यात आली आहेत. यापैकी 697 प्रकरणांचा तपास पोलिसांनी लावला आहे. तर महिलांची मानहानी केल्याची 266 गुन्हे दाखल असून यामध्ये 185 प्रकरणात आरोपींवर कारवाई केली आहे. याव्यतिरिक्त हुंडा छळवणूक प्रकरणात 313, अल्पवयीन मुलांचा छळाची 47 प्रकरणे दाखल केली आहेत.
कौटुंबिक हिंसाचार, छेडछाड, विनयभंग, फसवणूक, मारहाण, बलात्कार इ. आरोपांवर विविध पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. अनेक प्रकरणात पोलीस तपास करत असून अनेक आरोपींना अटकही झाली आहे. सायबर गुन्हे हे सध्याचे सोपे लक्ष्य ठरत असून सोशल मिडियावर मैत्री करुन फसवणूक करणार्यांचे प्रकार वाढले आहेत. सायबर पोलीस याबाबत वारंवार समाजमाध्यमात जागरूक राहण्याचे मेसेज पोस्ट करत असतात. तरीही अशा जाळ्यात अडकण्याचे प्रकार होत आहेत. सरासरी पंचवीस ते चाळीस गुन्हे विविध विभागातून नोंदविण्यात आले आहेत. तर या पध्दतीचा आर्थिक गुन्ह्याचा धोकाही वाढला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.