पालक गमावेल्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; मुंबई विद्यापीठाने केली शुल्ककपात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

school fees

पालक गमावेल्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; मुंबई विद्यापीठाने केली शुल्ककपात

मुंबई : कोरोना (corona) काळात पालक आई - वडील अथवा त्यापैकी एक पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्कात (orphanage student) कपात करण्याचे आदेश आज मुंबई विद्यापीठाने (Mumbai university) दिले आहेत. यामुळे विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयातील पदवी, पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या (degree student) शुल्कात सरासरी 30 टक्के कपात (fee concession) तर कोरोना काळात पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांना शुल्कात 100 टक्के सवलत मिळणार आहे. (corona-orphanage student-Mumbai university-degree student-fee concession-nss91)

ही शुल्क कपात शैक्षणिक वर्ष 2021-22 या वर्षासाठी लागू असल्याचे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. बळीराम गायकवाड यांनी काढलेल्या परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे. मागील वर्षभरात कोरोनाकाळात अनेकांचे रोजगार गेले तर अनेकांना वेतन कपात झाली आहे. यामुळे पालकांकडे शुल्क भरण्यास पैसे नाही म्हणून अनेक विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण सोडावे लागले. तर अनेकजण मिळेल ते काम करून शिक्षण घेऊ लागले. तर काहींचे पालकही गमावले. अशा विद्यार्थ्यांना दिलासा देण्याबाबत राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी घोषणा केली होती.

हेही वाचा: वसई-विरार महापालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकांमावर कारवाई करा - हायकोर्ट

त्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व कुलगुरुंची 30 जून रोजी बैठक पार पडली होती. यानंतर प्रत्येक विद्यापीठांनी एक समिती स्थापन करून त्यांच्या शिफारसीनुसार शुल्क कपात निश्चित केली आहे. यानुसार विद्यापीठाशी संलग्न कला, विज्ञान आणि वाणिज्य शाखांच्या पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या शुल्कात कपात सुचिवण्यात आली आहे. यानुसार कोरोनामुळे ज्या विद्यार्थ्यांचे आई किंवा वडील अथवा दोन्ही पालकांचे निधन झाले आहे अशा विद्यार्थ्यांना कोणतेही शुल्क आकरण्यात येणार नाही. याचबरोबर सद्याची परिस्थिती लक्षात घेता इतर विद्यार्थ्यांसाठीही शुल्क कपात जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये ग्रंथालय, प्रयोगशाळा, जिमखाना, अभ्यासेतर उपक्रमांचे शुल्क यामध्ये 50 टक्के कपात केली आहे.

यासाठी 25 टक्के कपात

विद्यापीठात जमा होणाऱ्या परीक्षा शुल्क आणि विकास निधी यामध्ये 25 टक्के कपात करण्यात आली आहे. याचबरोबर उद्योग भेट शुल्क, विद्यार्थी विकास निधी, ग्रंथालय व प्रयोगशाळा अनामत रक्कम आणि कॉशन शुल्क पूर्णत: माफ करण्याचे आदेश या परिपत्रकात देण्यात आले आहे. ज्या महाविद्यालयांमध्ये नियतकालिक प्रसिद्ध केले जाते त्याचे शुल्कही न आकारण्याबाबत यामध्ये स्पष्ट करण्यात आले तर जे महाविद्यालय ऑनलाइन नियतकालिक प्रसिद्ध करतात त्यांना 25 टक्के शुल्क घेण्यास सांगण्यात आले आहे.

Web Title: Corona Orphanage Student Mumbai University Degree Student Fee Concession

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..