ठाणे जिल्ह्यात कोरोनाची रुग्णवाढ सुरूच! गेल्या २४ तासात इतक्या नव्या रुग्णांची भर

राहुल क्षीरसागर
Sunday, 9 August 2020

विवारी दिवसभरात 1 हजार 207 रुग्णांची तर, 29 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्ण संख्या 98 हजार 167 तर, मृतांची संख्या आता दोन हजार 747 झाली आहे.  

 

ठाणे : ठाणे जिल्ह्यात शनिवारी रुग्णांच्या संख्येसह मृतांच्या संख्येत कमालीची वाढ झाल्याचे दिसून आल्यानंतर रविवारी बाधित रुग्णांच्या संख्येत घट झाल्याचे दिसून आले. रविवारी दिवसभरात 1 हजार 207 रुग्णांची तर, 29 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्ण संख्या 98 हजार 167 तर, मृतांची संख्या आता दोन हजार 747 झाली आहे.  

सिडकोच्या पणन विभागाच्या दुर्लक्षामुळे ग्राहकांना फटका; विलंब शुल्काची आकारणी सुरूच

ठाणे जिल्ह्यात नवी मुंबई महापालिका क्षेत्रात सर्वाधिक 332 रुग्णांची, 8 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. कल्याण-डोंबिवली महापालिकाक्षेत्रात 297 रुग्ण तर, 9 मृत्यू;  ठाणे पालिका हद्दीत 202 बाधितांसह 3 मृत्यू; मीरा-भाईंदरमध्ये 164 रुग्णांसह 1 मृत्यू; भिवंडीत 23 रुग्ण; उल्हासनगर 23 रुग्णांसह 3 मृत्यू; अंबरनाथमध्ये 66 रुग्ण, तर 1 मृत्यू; बदलापूरमध्ये 54 रुग्ण; तसेच, ठाणे ग्रामीण भागात 46 रुग्णांची तर, 4 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या 7 हजार 416 तर, मृतांची संख्या 198 वर गेली आहे.

------------------------------------------------------------------ 

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona outbreak continues in Thane district! So many new patients in the last 24 hours