मुंबईत 83% ऑक्सिजन बेड्स रिकामे

corona hospital beds
corona hospital beds sakal media

मुंबई : गेल्या काही आठवड्यांपासून मुंबईत आठवड्यातील पॉझिटिव्हीटीचे (corona positive rate) प्रमाण कमी झाले आहे. त्यासोबतच रुग्णालयांमध्येही बेड्स रिक्त असण्याची संख्या वाढली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) आकडेवारीनुसार, मुंबईतील रूग्णालयांतील कोविड 19 साठीचे जवळपास 80 टक्क्यांपेक्षा जास्त बेड्स रिक्त आहेत. आणि सुमारे 83% ऑक्सिजन बेड्स (Oxygen Beds) रिक्त आहेत. कोविड -19 उपलब्ध असलेल्या एकूण 20,015 बेड्सपैकी 16,038 बेड रिक्त आहेत, तर संपूर्ण मुंबईत 10,519 ऑक्सिजन बेडपैकी 8,828 उपलब्ध आहेत. 52.35% आयसीयू आणि 44.7% व्हेंटिलेटर बेड रिक्त आहेत. आयसीयूच्या (ICU Beds)2,523 खाटांपैकी 1,321 रिकामे आहेत आणि 1377 व्हेंटिलेटर बेड्सपैकी 616 बेडस् मुंबईत रिक्त आहेत. ( corona Oxygen Beds Eighty three percent vacant in Mumbai)

नेस्को जंबोतील 50 टक्के आयसीयू बेड्स रिक्त आहेत. मुंबईत सध्या दररोज 500 ते 600 कोरोना रुग्ण सापडत आहे. याचा सकारात्मक परिणाम दिसत असून मुंबईतील जंबो कोविड केंद्रातील आयसीयू 50 टक्के बेड्स रिक्त आहेत. सध्या नेस्को जंबो कोविड केंद्रात 2015 पैकी फक्त145 बेड्स भरलेले आहेत. तर, 1870 एवढे बेड्स रिक्त आहेत. तर, फक्त 1 ऑक्सिजन बेड भरलेला असून 721 बेड्स रिक्त आहेत. एकूण 206 आयसीयू बेड्स पेकी 105 आयसीयू बेड्स रिक्त आहेत. म्हणजेच जवळपास 50 टक्के आयसीयू बेड्स रिक्त आहेत. 123 व्हेंटिलेट्स बेड्सपैकी 101 बेड्स भरलेले असून 22 रिक्त आहेत. तर, नॉन व्हेंटिलेटर 83 बेड्स पूर्ण क्षमतेने रिक्त आहेत.

नेस्कोच्या अधिष्ठाता डॉ. नीलम अंद्राडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कमी झालेल्या रुग्णसंख्येमुळे केंद्रातील भार कमी झाला आहे. सर्वात जास्त परिणाम हा आयसीयूतील रुग्णांवर झाला आहे. आयसीयूमध्ये 50 टक्के बेड्स रिक्त आहेत. गंभीर रुग्णांची संख्याही आता कमी झाली आहे. आजपासून फेज 2 सुरू झाले असून फेज 1 मधील रुग्ण इथे शिफ्ट करण्यात आले आहेत. मुंबईचा एकंदरीत पॉझिटीव्हिटी दर 10.13% आहे. आतापर्यंत शहरात एकूण 7,104,722 कोविड -19 चाचण्या घेण्यात आल्या आहेत. सध्या मुंबई शहराचा मृत्यूदर 2.14% आहे. शहरातील 8,351 सक्रिय रुग्ण आहेत. जवळपास 43% केसेस हे लक्षणे नसलेली, 48% लक्षणे असलेले आणि 09% गंभीर आहेत.

सध्या शहराचा रुग्ण बरे होण्याचा दर 96% आहे. तर, एकूण रुग्णवाढीचा दर 0.09% पर्यंत खाली आला आहे. एकूण 24 वॉर्डपैकी 15 वॉर्डमध्ये मुंबई शहराच्या एकूण सरासरी रुग्णवाढीच्या दरापेक्षा जास्त दर आहे. अंधेरी पश्चिम या क्षेत्रात येणाऱ्या के-वेस्ट प्रभागातील रुग्णवाढीचा दर सर्वाधिक वाढीचा दर 0.16 % आहे. दादर, माहीम आणि धारावी हे परिसर येणारे जी-उत्तर वॉर्डात सर्वात कमी रुग्णवाढीचा दर 0.06% आहे. मुंबईचा दुप्पट दर आता 716 दिवसांवर आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com