कोरोना महामारीनंतर पेन किलर गोळ्यांच्या वापरात वाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

tablets

कोरोना महामारीनंतर पेन किलर गोळ्यांच्या वापरात वाढ

मुंबई : कोरोना महामारीनंतर (corona pandemic) पेन किलर गोळ्यांच्या (pain killer tablets) वापरात वाढ झाली आहे. आपल्या शरीराला काही त्रास झाला तर पेन किलर गोळी घेण्याचे प्रमाण वाढले आहे. परंतु,पेनकिलर गोळ्यांचे अतिसेवन (tablet addiction) हे आरोग्यासाठी त्रासदायक (health problems) आहे. अमेरिकन क्रोनिक पेन असोसिएशनतर्फे (American chronic pain association) संपूर्ण जगभर सप्टेंबर हा महिना हा वेदना जागरूकता महिना  म्हणून साजरा केला जातो, म्हणजेच शरीरातील वेदना का होतात याचा शोध घेऊनच त्यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे यासाठी मार्गदर्शन केले जाते.

हेही वाचा: बारामती नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी इच्छुकांची मोर्चेबांधणी

ज्येष्ठ फिजिशियन व छातिरोग तज्ञ डॉ. प्रवीण भुजबळ यांच्या म्हणण्यानुसार, अंग दुखणं म्हणजेच  शरीराला सतत त्रास होणे.  आता या अंगदुखीचे  सुद्धा अनेक प्रकार आहेत यामध्ये छातीत दुखणे, गुडघे व सांधे दुखणे, तसेच जे नागरिक उदरनिर्वाहासाठी अंगमेहनतीची  कामे करतात त्यांना सतत अंगदुखीचा त्रास होतो.

हल्ली तिशीतल्या तरुण पिढीला सुद्धा शारीरीक दुखणी सुरू झाली आहेत.  अनेक नागरिक वर्षानुवर्षे अंगदुखीसाठी पेन किलरचा वापर करत असतात, कोरोना महामारीनंतर तर पेन किलर गोळ्यांचा वापर वाढला असून ते आरोग्यासाठी धोकादायक आहे. अनेक आजारांमध्ये अंग मोडून येऊ शकते. प्रामुख्याने संसर्गजन्य ताप, मलेरिया, टायफॉइड, डेंग्यू, अशा आजारांमध्ये तापासोबत अंग दुखते. काहीवेळा शरीरातील डी जीवनसत्व कमी असल्याने सांधेदुखी होते. दात दुखणे, हातापायात वेदना होणे, डोकेदुखी अशा सर्वसाधारण आजारांमध्ये अनेकजण मेडिकल दुकानात जाऊन पेन किलर घेतात त्यामुळे, त्यांना तात्पुरता आराम मिळतो परंतु त्या आजाराची कारणे शोधली पाहिजेत.

हेही वाचा: मुंबईतील शाळा दिवाळीनंतर सुरू होणार? महापौरांनी दिलं उत्तर

अनेकवेळा हृदयविकार , ब्रेन स्ट्रोक या आजाराची  सौम्य लक्षणे  दिसल्यावर अनेकजण पेनकिलर म्हणजे वेदनाशामक गोळ्यांचा मारा करतात त्यामुळे पुढील काही दिवस ती लक्षणे दिसत नाहीत व रुग्णाला खात्री वाटते की आपला आजार बरा झाला आहे परंतु तोच आजार थोड्या दिवसांनी परत उफाळून येतो व त्यावेळी त्याचे निदान करणे कठीण जाते. पेनकिलरच्या अतीसेवनामुळे किडनी व हृदयाला  सर्वाधिक धोका निर्माण होऊ शकतो, असे ही तज्ञ सांगतात.

सेल्फ मेडिकेशनचे वाढते प्रमाण

स्व-औषधपद्धती म्हणजे एखाद्या व्यक्तीने किंवा त्या व्यक्तीच्या कुटुंबाद्वारे स्वतः वर औषधोपचार करणे किंवा लक्षणे कमी करण्यासाठी औषधे निवडणे आणि वापरणे.  डोकेदुखी, सर्दी-खोकला, पाठदुखी आणि इतर अनेक आजारांसाठीच्या पेनकिलर आपल्या घरीही उपलब्ध असतात, मात्र पेनकिलर घेऊन आजार अंगावर काढणे हे घातक ठरेल असा सल्ला डॉक्टर्स देतात.

loading image
go to top