esakal | विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घ्या; डॉक्टर सेलचे शिक्षकांना निवेदन | Student Health care
sakal

बोलून बातमी शोधा

students

विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घ्या; डॉक्टर सेलचे शिक्षकांना निवेदन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

घाटकोपर : कोरोना महामारीमुळे (corona pandemic) बंद असलेल्या शाळा अखेर दीड वर्षांनंतर कोविड नियमांचे पालन (corona rules) करत सुरू करण्यात आल्या. शासनाने दिलेल्या नियमांत विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत (student health) शाळेला सूचना देण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर विक्रोळीतील राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेलचे ईशान्य मुंबई जिल्हा अध्यक्ष डॉ. योगेश भालेराव (dr yogesh bhalerao) यांच्या वतीने विक्रोळीतील खासगी व पालिका शाळेतील व्यवस्थापकांना निवेदन देत विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत सूचना केल्या आहेत.

हेही वाचा: मुंबई विद्यापीठाची सिनेट वादळी ठरणार?

मुंबईत कोरोनास्थिती नियंत्रणात असली तरी कोरोना पूर्णतः गेलेला नाही. विद्यार्थ्यांचे भवितव्य लक्षात घेत शासनाने शाळा सुरू केल्या आहेत. विद्यार्थांना शाळेत असताना काही आरोग्याच्या अडचणी जाणवल्यास त्यांना मोफत आरोग्य सुविधा देण्यात याव्यात, त्यांची विशेष काळजी घेण्यात यावी, यासंदर्भात शाळा व्यवस्थापकांना निवेदन दिले असल्याचे डॉ. योगेश भालेराव यांनी सांगितले.

loading image
go to top