कोविड महामारीचा मुलांच्या सर्वांगीण विकासावर परिणाम; वाचा सविस्तर | corona pandemic update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Children corona

कोविड महामारीचा मुलांच्या सर्वांगीण विकासावर परिणाम; वाचा सविस्तर

मुंबई :  कोविड-19 महामारीच्‍या (corona pandemic) काळादरम्‍यान शारीरिक हालचालीचा अभाव, स्क्रीनसमोर व्‍यतित करणाऱ्या वेळेमध्‍ये लक्षणीय वाढ आणि अस्‍ताव्‍यस्त सामाजिक जीवनाचा मुलांच्‍या जीवनावर (Impact on children) प्रतिकूल परिणाम झाला आहे. अधिकाधिक पालकांना त्‍यांच्‍या मुलांची बदलती वागणूक व आरोग्‍याबाबत चिंता (health problems) लागली आहे. एका खासगी रुग्णालयाने (private hospital) कोरोना महामारीचा मुलांच्‍या शारीरिक व मानसिक आरोग्‍यावर झालेला परिणाम जाणून घेण्‍यासाठी मुंबईतील जवळपास 8000 पालकांशी संपर्क (parents contact) साधला.

हेही वाचा: "मराठी भाषा अनिवार्य न करणाऱ्या इंग्रजी माध्यमांच्या शाळांवर होणार कारवाई"

या निरीक्षणानुसार, 95 टक्के पालकांच्‍या मते, महामारीमुळे त्‍यांचा मुलांच्‍या शारीरिक, भावनिक, मानसिक व सामाजिक विकासावर परिणाम झाला आहे.  ऑगस्‍ट ते ऑक्‍टोबर 2021 दरम्‍यान मुंबईतील 5 वर्षे ते 18 वर्षे वयोगटातील मुलांच्‍या पालकांसह संशोधन करण्‍यात आले. यात लसीकरणाविषयीही मते विचारण्यात आली होती. ज्यात 32 टक्‍के पालक म्‍हणाले की, त्‍यांच्‍या मुलांचे त्‍यांच्‍या वयानुसार आवश्‍यक नियोजित लसीकरण झालेले नाही. तर, 44 टक्‍के पालक त्‍यांच्‍या बालरोगतज्ञांशी सल्‍ला केल्‍यानंतरच मुलांना कोविड-19 विरोधात लस देतील.  

मुलांचे वयोगट, इलेक्‍ट्रॉनिक गॅजेट्सवर ते व्‍यतित करत करणारा कालावधी, शारीरिक व्‍यायाम, पोषण व खाण्‍याच्‍या सवयी, झोपेचा कालावधी व भावनिक वर्तणूक असे विविध घटक लक्षात घेत हे सर्वेक्षण करण्‍यात आले. 7,670  पालकांसोबत संवाद साधलेल्‍या या संशोधनातून निदर्शनास आले की, आजवर मुलांचे कोविड-19 च्‍या आरोग्‍यविषयक दुष्‍परिणामांपासून मोठ्या प्रमाणात संरक्षण झाले असले तरी या संकटाचा त्‍यांच्‍या आरोग्‍यावर मोठा परिणाम झाला आहे.

गॅजेटचा वापर

62 टक्‍के पालकांनी सांगितले की, त्‍यांची मुले दररोज जवळपास 4 ते 6 तास इलेक्‍ट्रॉनिक गॅजेट्सवर (लॅपटॉप्‍स/ मोबाइल डिवाईसेस) वेळ व्‍यतित करतात; 23 टक्‍क्‍यांहून अधिक पालकांनी सांगितले की, वीकेण्‍डला त्‍यांची मुले इलेक्‍ट्रॉनिक गॅजेट्सवर 6 तासांपेक्षा अधिक वेळ व्‍यतित करतात. 57 टक्‍के पालकांनी सांगितले की, त्‍यांची मुले मोकळ्या वेळेदरम्‍यान टीव्‍ही पाहतात किंवा व्हिडिओ गेम्‍स खेळतात आणि फक्‍त 30 टक्‍के मुलांना पेटिंग/डान्सिंग इत्‍यादी सारख्‍या आवडी आहेत.

हेही वाचा: "मराठी भाषा अनिवार्य न करणाऱ्या इंग्रजी माध्यमांच्या शाळांवर होणार कारवाई"

शारीरिक व्‍यायाम

41 टक्‍के पालकांनी सांगितले की, त्‍यांची मुले दररोज 1 ते 2 तास खेळायला जातात/ शारीरिक व्‍यायाम करतात; १६ टक्‍के पालकांनी त्‍यांच्‍या मुलांना ऑनलाइन त्‍यांच्‍या मित्रांना भेटण्‍याची परवानगी दिली.

शारीरिक आरोग्‍य

57 टक्‍के पालकांनी सांगितले की, महामारीदरम्‍यानी त्‍यांची मुले वारंवार आजारी पडली नाही, पण 37 टक्‍के पालकांनी सांगितले की, त्‍यांच्‍या मुलांना सतत सर्दी, खोकला व घसा दुखणे यांचा त्रास झाला. 21 टक्‍के पालकांनी सांगितले की, त्‍यांच्‍या मुलांना थकवा व चक्‍कर आल्‍यासारखे झाले. 19 टक्‍के पालकांनी सांगितले की, त्‍यांच्‍या मुलांना पचनविषयक समस्‍या जाणवल्‍या. 10 टक्‍के टक्‍के पालकांनी सांगितले की, त्‍यांच्‍या मुलांना डोळे कोरडे पडणे, अंधुक दिसणे याचा त्रास झाला आणि त्‍यांना चष्‍मे घालावे लागले. 39  टक्‍के पालकांनी सांगितले की, महामारीदरम्‍यान त्‍यांच्‍या मुलांचे वजन लक्षणीयरित्‍या वाढले आणि ३० टक्‍क्‍यांहून अधिक पालकांनी सांगितले की, त्‍यांच्‍या मुलांना सतत स्‍नॅकिंग करण्‍याची सवय लागली. 58 टक्‍के पालकांनी सांगितले की, त्‍यांची मुले दररोज 8 ते 10 तास झोपतात; 4 टक्‍के टक्‍के पालकांनी सांगितले की, त्‍यांच्‍या मुलांना झोप येण्‍यामध्‍ये त्रास झाला.

मानसिक आरोग्‍य

62 टक्‍के पालकांनी सांगितले की, त्‍यांच्‍या मुलांनी त्‍यांच्‍यासोबत अधिक वेळ व्‍यतित करण्‍याची मागणी केली. 59 टक्‍के पालकांनी सांगितले की, महामारी सुरू झाल्‍यापासून त्‍यांची मुले चिडचिड करू लागली. 52 टक्‍के पालकांनी सांगितले की, त्‍यांच्‍या मुलांमध्‍ये अवधानाचा अभाव जाणवला. 23 टक्‍के पालकांनी सांगितले की, त्‍यांच्‍या मुलांना नखे खाणे सारख्‍या अनारोग्‍यकारक सवयी लागल्‍या.

loading image
go to top