घाबरलो...खचलो... पण सावरलोही, परिचारिकांची वर्षभर रूग्ण सेवा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

घाबरलो...खचलो... पण सावरलोही, परिचारिकांची वर्षभर रूग्ण सेवा

घाबरलो...खचलो... पण सावरलोही, परिचारिकांची वर्षभर रूग्ण सेवा

मुंबई: कोरोना रुग्ण सेवा देता देता एक दिवस स्वतःला आणि कुटुंबातील प्रत्येकाला कोरोनाने गाठलं तेव्हा मात्र, पायाखालची जमीन सरकली. पण, त्यातून ही सावरत, शिकत, अनुभव घेत धैर्याने कायम अशाच पद्धतीने लढत राहू असा निश्चय जागतिक परिचारिका दिनानिमित्त मुंबईतील परिचारकांनी केला आहे. पालिकेसह खासगी आणि सरकारी रुग्णालयात अविरत सेवा देत असताना कोरोना पॉझिटिव्ह येऊनही रुग्ण सेवा थांबू नये यासाठी गेल्या एका वर्षात प्रत्येक परिचारिकेने प्रयत्न केला आहे. अशाच काही परिचारकांचे अनुभव.

घर आणि रुग्णांची चिंता कायम -

घरी 6 लोक, पती बेस्टमध्ये कामाला. असं असताना जुलै महिन्यात पहिल्यांदा कोरोनाने गाठलं. पती कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर सर्वच पॉझिटिव्ह येणार याची खात्री होती. पण, आपल्या घरापर्यंत कोरोना पोहोचला या भीतीने पायाखालची जमीन सरकली. वयस्कर सासू-सासरे यातून सुखरूप यावे हीच प्रार्थना सतत असायची. पण, नशिबाने साथ दिली आणि माझ्या दोन लहान मुलांसह पती आणि सासू-सासरे कोरोनातुन सुखरुप बरे झाले. आपली माणसे डोळ्यासमोर जातात हे पाहून खूप त्रास होतो. पण, अनेक जण कोरोना झाल्याच्या भीतीनेच जातात. इच्छाशक्ती प्रबळ असणे हेच या कोरोनाने शिकवलं आहे हा अनुभव सांगितला आहे नायर रुग्णालयात आयसीयू आणि कोरोना वॉर्डमध्ये काम करणार्‍या परिचारका संगीता पाडावे यांनी.

हेही वाचा: आजोबांचं क्वारंटाइन संपलं; नातेवाईक आणायला गेले अन् बसला धक्का

कोरोनात मानसिक आधार महत्वाचा - 

आयसीयूत सतत 8 ते 10 तास पीपीई किट, मास्क घालून काम करत रुग्ण सांभाळणे हे जरी कठीण वाटत असले तरीही रुग्ण सेवा बजावण्याचे कार्य करायचेच आहे हा ध्यास कायम होता. सहपरिचारिका पॉझिटिव्ह येत होत्या. त्यांना धीर देता देता रुग्णांना ही मानसिक आधार देणे महत्त्वाचे आहे हे प्रकर्षाने जाणवू लागले. धीर सोडू नका, सकारात्मक राहा असं सतत रुग्णांना सांगितले जाते. कोरोनाशी कसे लढायचे? याबाबतचे प्रशिक्षण आणि मार्गदर्शन दिले गेले होते. पण, प्रत्यक्षात रुग्ण हाताळताना मानसिक आधार दिला की रुग्ण ही मानसिक तणावातुन बाहेर येत डिस्चार्ज होऊन गेल्याचा आनंद मनाला सुख देऊन जायचा.

अनिता राजेंद्र पळशीकर, परिसेविका, नायर रुग्णालय

प्रशासकीय मदत आवश्यक-

या कोरोना काळात प्रशासकीय मदत होणे फारच महत्वाची होती. मृत्यूदर, ऑक्सिजनची मागणी, आणि तात्काळ मृत्यू होण्याचे प्रमाण वाढल्याने परिचारिका सध्या नाखूश आहेत. पण, गेल्या वर्षभरापासून

परिचारिकांनी कोणत्याच प्रकारची तक्रार न करता काम केले ही बाब कौतुकास्पद आहे. डाॅक्टर्स आणि परिचारिका यावेळेस मानसिक तणावाखाली जास्त आहेत. पण, भीती कमी झाल्याने इतर कोणत्याही महामारीशी लढण्यासाठी परिचारिका तयार आहेत.

स्नेहा पेडणेकर,  अधिसेविका, नायर रुग्णालय

Web Title: Corona Pandemic World Nurse

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Coronavirus
go to top