घरी विलगीकरणात आहात? BMC ने तुम्हाला उपलब्ध करुन दिलीये 'ही' विशेष सुविधा

समीर सुर्वे
Saturday, 29 August 2020

कोव्हिडवर मात केल्यानंतरही रुग्णांना 7 दिवस गृहविलगीकरणात ठेवण्यात येते. अशा रुग्णांशी नियमित संपर्क ठेवण्यासाठी पालिकेने स्वतंत्र यंत्रणा उभारली आहे.

मुंबई : कोव्हिडवर मात केल्यानंतरही रुग्णांना 7 दिवस गृहविलगीकरणात ठेवण्यात येते. अशा रुग्णांशी नियमित संपर्क ठेवण्यासाठी पालिकेने स्वतंत्र यंत्रणा उभारली आहे. तसेच, कोव्हिडमुळे मानसिक धक्क्यात असलेले रुग्ण आणि नातेवाईकांच्या समुपदेशनासाठीही पालिकेने हेल्पलाईन सुरु केली आहे. 18001024040 या हेल्पलाईनवरुन त्यांचे समुपदेशन करण्यात येत आहे.

नक्की वाचा : अजित पवारांनी GST परिषदेत केंद्राकडे केली 'ही' मागणी, म्हणालेत थकबाकी वाढत राहिल्यास 1 लाख कोटींवर जाईल

21 हजार 250 पैकी 14 हजार रुग्णांनी आतापर्यंत गृहविलगीकरणाचा कालावधी पुर्ण केला आहे. गृहविलगीकरणात असलेल्या व्यक्तीशी सतत संपर्क ठेवण्यासाठी जुलै महिन्यापासून पालिकेने 'मुंबई  मैत्री' मोहिम सुरू केली आहे. याअंतर्गत 21 हजार 250 रुग्णांशी सतत संपर्क ठेवण्यात आला असून त्यातील 14 हजार 800 रुग्णांनी 7 दिवसांचा कालावधी पुर्ण केला आहे. कोव्हिडवर मात केलेल्या रुग्णांपैकी काहींना औषधोपचारांची आवश्यकता असते. त्यामुळे त्यांचा नियमीत पाठपुरवा होणेे गरजेचे असते. यासाठी पालिकेने 'प्रकल्‍प मुंबई’ या स्‍वयंसेवी संस्‍थेच्‍या आणि पोर्टीया मेडिकल या संस्‍थेच्‍या सहकार्याने ही मोहिम राबवली आहे.

(संपादन : वैभव गाटे)

For corona patient counseling BMC made helpline 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: For corona patient counseling BMC made helpline